ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Crop Insurance | अर्रर्र..! पावसाचा परिणाम थेट केंद्राच्या पीक विमा योजनेवर, शेतकऱ्यांना होणारं फायदा का तोटा?

Crop Insurance | मात्र, शेती व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाने साथ दिली तरच शेतकऱ्यांचं शेतीतील (Agriculture) पिक बहरत. सध्या खरिप हंगाम सुरू आहे. हंगाम सुरू होऊनही पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या. त्यानंतर महाराष्ट्रात (Agriculture in Maharashtra) चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरण्या केल्या. मात्र, मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या या पिकाचा (Crop) नायनाट केला. याचमुळे आता खरिपाचे चित्र बदलल्याचे दिसून येत आहे. पण आता या सर्वाचा परिणाम थेट पीक विमा (Crop Insurance) योजनेवर होत आहे. कसा तो सविस्तर जाणून घेऊयात.

वाचा: Sugarcane | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ऊसाच्या एफआरपीचे 31 हजार कोटी खात्यावर जमा, जाणून घ्या किती टक्के दिली रक्कम

पावसाचा परिणाम पीक विमा योजनेवर
पावसाचा परिणाम आता थेट प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर (PM Crop Insurance Scheme) होत आहे. ज्याचं कारण म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) सहाय्य दिले जाते. या योजनेत सहभागी होण्याकरता एक मुदत दिली जाते. त्याचमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेत सहभागी होत आहेत. ज्यामुळे. सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असून नांदेड जिल्ह्यात तब्बल 6 लाख 60 हजार शेतकऱ्यांनी आपला नोंदवला आहे. तसेच मुदत संपण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन देखील कृषी अधीक्षकांकडून करण्यात आले आहे.

वाचा: Guar Farming | शेतकऱ्यांनो खरिपात करा ‘या’ पिकाची लागवड अन् करा लाखोंची कमाई, जाणून घ्या पीक व्यवस्थापन

खरिपाचे गणित बिघडले
पावसाअभावी खरिपातील पेरण्या लांबल्या. कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढवले. तर आता मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचा नायनाट होताना दिसत आहे. तर राज्यात सर्वात जास्त खरीप पिकांचे नुकसान हे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले आहे. खरिपात सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान होतय. म्हणूनच आता शेतकऱ्यांना केवळ पीक विम्याच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई मिळू शकते. ज्यासाठी 31 जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Rains impact directly on Centre crop insurance scheme, why lose benefits to farmers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button