ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather | शेतकऱ्यांच्या चिंतेत भर! राज्यासह ‘या’ भागांत पुढच्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहे.

Weather | त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे शेतीतील (Agriculture) पीक अक्षरशः वाहून गेले आहेत. त्याचमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) फटका बसला आहे. सध्या पावसाचा (Maharashtra Monsoon) जोर कमी झाला असला तर देखील पुढच्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवला आहे.

वाचा: lumpy skin Disease | पशुपालकांनो काळजी घ्या! जनावरांमध्ये पसरतोय ‘हा’ विषाणू, आतापर्यंत 999 जनावरे दगावली

पुढच्या दोन दिवसांत पावसाचा इशारा
या सततच्या होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेती (Agricultural Information) पिकांना मोठा फटका बसला आहे. गडचिरोली, चंद्रपूर या भागातील नद्यांची पाणी पातळी सध्या घटली आहे. परंतु अशातच आता पुन्हा हवामान विभागाने पुढच्या दोन दिवसांत मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

वाचा: Weather | पुढचे 5 दिवस संपूर्ण महाराष्ट्रावर मेघराजाचचं राज्य! वाचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यात ओला दुष्काळ
अनेक दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस होत असल्याने तेथील शेतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा. तेथील शेतकऱ्यांचे नुकसानीची पाहणी करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा. त्याचबरोबर विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलवून सध्या परिस्थितीचा आढावा घ्यावा अशी मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अजित पवार यांनी पत्र लिहिले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Add to the concern of farmers! Warning of heavy rains in next two days in these parts of the state

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button