ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

DPR | आता शेतकऱ्यांना थेट पाहता येणार कांदा चाळीसह ‘या’ प्रकल्पांचा डीपीआर, जाणून घ्या डीपीआर आणि प्रक्रिया

शेतकऱ्यांना बऱ्याच कृषी योजनांचा लाभ देताना मागितले जाणारे महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे डीपीआर होय. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) अर्थात आपला सविस्तर प्रकल्प अहवाल.

DPR | ज्यामध्ये तुमच्या प्रकल्पाचा खर्च (Financial) किती आहे त्यामध्ये गुंतवणूक (Investment) किती आहे किंवा त्याच्याबद्दल असलेली सविस्तर अशी माहिती. त्या अहवालाच्या माध्यमातून द्यायची असते. मात्र शेतकऱ्यांना (Agriculture) कांदा चाळीसह हे डीपीआर बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. याचासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

वाचा: Sugarcane | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ऊसाच्या एफआरपीचे 31 हजार कोटी खात्यावर जमा, जाणून घ्या किती टक्के दिली रक्कम

शेतकरी थेट पाहू शकणार डीपीआर
शेतकरी उत्पादक कंपन्या एफपीओ एफपीसी याचबरोबर शेतकऱ्यांचे गट महिला बचत गट या सर्वांसाठी पोखरा योजनेंतर्गत मोठ्या योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये 300 टनाचे कांदा चाळ, सोयाबीन प्रकल्प या व्यतिरिक्त हळद प्रक्रिया युनिट, सोया मिल्क, पोल्ट्री फीड युनिट अशा प्रकारचे मोठे प्रकल्प आहेत. ज्याची किंमत 20 लाखापेक्षा जास्त सुद्धा आहे. अशा प्रकल्पाचे प्रकल्प अहवाल बनवणे सुद्धा शेतकऱ्यांना अतिशय गुंतागुंतीचे होते. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत होता. हेच प्रकल्प अहवाल डीपीआर आता पोखराच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

वाचा: Weather | शेतकऱ्यांच्या चिंतेत भर! राज्यासह ‘या’ भागांत पुढच्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा

कसा पाहायला डिपीआर?
यासाठी तुम्हाला महापोखराच्या वेबसाईटवर https://mahapocra.gov.in/ जावे लागेल. त्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना आणि हे प्रकल्प अहवाल आता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या लिंकवरती गेल्यानंतर तुम्ही योजनाच्या मार्गदर्शक सूचना नवीन अपलोड केलेले डीपीआर पाहू शकता. एफपीओ साठी एफपीसीसाठी बचत गटांसाठी किंवा शेतकऱ्यांचे गट आहेत याच्यासाठी राबवले जाणारे 300 टन कांदा चाळीचा डीपीआर आहे. हळद प्रक्रिया उद्योग डीपीआर, पोल्ट्री डीपीआर, सोया मिल्कसाठी जे काही युनिट आहे त्याचा डीपीआर आहे. अशाप्रकारे तुम्ही थेट डीपीआर पाहू शकणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: DPR of projects including onion chali now available to farmers live know DPR and process

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button