ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Sugarcane | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ऊसाच्या एफआरपीचे 31 हजार कोटी खात्यावर जमा, जाणून घ्या किती टक्के दिली रक्कम

भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. जेथे नागरिकांचा शेती व्यवसायावर कल आहे. महाराष्ट्रामध्ये (Agriculture in Maharashtra) प्रामुख्याने ऊस पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते.

Sugarcane | शेतकरी इतरही पीके घेतातच. मात्र ऊस पिकावर (Sugarcane crop) शेतकरी जास्त भर देताना दिसून येतात. त्याची अनेक कारणं आहेत. ऊस पिकाचे व्यवस्थापन (Sugarcane Management) करणे शेतकऱ्यांना सोपे पडते. त्याचबरोबर उसाला रास्त भाव देखील आहे. त्यामुळेच शेतकरी ऊस पिकाला प्राधान्य देतात. आता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊसाचा एफआरपी (Sugarcane frp) जमा करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात एफआरपी जमा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता राज्यातील साखर कारखान्यांनी संपलेल्या ऊस गाळप हंगामात शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर (Account) एफआरपीचे तब्बल 31 हजार कोटी रुपये जमा केले आहेत. शेतकर्‍यांना देय एफआरपीचा थकित आकडा 1 हजार 536 कोटी 19 लाख रुपये आहे. तर एकूण देय रक्कम 3.16 टक्के एवढी आहे.

वाचा: Pipe Subsidy | शेतकऱ्यांनो शेतीतील पाइपलाईनीसाठीही मिळतंय अनुदान, जाणून घ्या योजना अन् त्वरित करा ‘असा’ अर्ज

ऊसाचा एफआरपी
नुकत्याच 15 जुलैच्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आलीय. साखर हंगामात (Sugar season)एकूण 200 साखर कारखाने सुरू होते. तर ऊसाची रास्त आणि किफायतशीर किंमतीचे तथा एफआरपीची एकूण देय रक्कम 32 हजार 82 कोटी 62 लाख रुपये एवढी होती. त्यापैकी 31 हजार 68 कोटी 49 लाख रुपये शेतकर्‍यांना वितरीत करण्यात आली आहेत. त्याचबरोबर काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त रक्कम शेतकर्‍ यांच्या खात्यावर काम केली आहे.

वाचा: Irrigation Yojana | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार थेट 80 टक्के अनुदान, जाणून घ्या कसा मिळणार लाभ

किती प्रमाणात झाला एफआरपी वाटप?
खरं तर, आतापर्यंत राज्यातील 90 कारखान्यांनी शेतकऱ्यांना ही एफआरपीची रक्कम दिली आहे. तर ही रक्कम 80 ते 90 टक्के प्रमाणात देणारे कारखाने 99 आहेत. त्याबरोबर 60 ते 79 टक्के रक्कम 7 कारखान्यांनी दिलीय. तर शून्य ते 59 टक्के रक्कम 4 कारखान्यांनी दिलीय. तर अजून देखिल 110 कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देणे बाकी आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! 31 thousand crores of sugarcane FRP deposited in the account, know how much percentage of the amount paid

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button