ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Onion Rate | शेतकऱ्यांना मोठा फटका! कांदा दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

बाजारात कधी कोणत्या वस्तूचे दर कमी जास्त होतील हे काही सांगता येत नाही. कांद्याच्या दराचे देखील असेच काहीसे आहे.

Onion Rate | कांदा दरात एकाएकी वाढ होते, तर कधी घसरण. कांद्याचे दर (Onion Rate) वाढले की, शेतकरी वर्ग आनंदात असतो, तर सर्वसामान्य ग्राहक चिंतेत. हे उलट सुलट चक्र फिरतच असतं. कोण्या एकाला याचा चटका सहन करावाच लागतो. शेतकरी शेतीतील (Agriculture) कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी कांदा (Onion) साठवणूक करून ठेवतात. यासंदर्भात केंद्र सरकारकडून ग्राहकांचे आर्थिकरित्या (Financial) खच्चीकरण होऊ नये यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे

दरवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारची भूमिका
बाजारात कांद्याचे दर वाढताच शेतकरी हा कांदा बाहेर काढतात. परंतू या वाढत्या दराचा सामान्यांना आर्थिक (Financial) फटका बसतो. म्हणून आता केंद्र सरकारने कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. खर तर, दिवाळीनंतर कांद्याच्या दरात भरमसाठ वाढ होते. मात्र, ही दरवाढ होण्यापूर्वीच केंद्र सरकार दरवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात आहे. आता केंद्र सरकार राखीव कांदा बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

वाचा: Irrigation Yojana | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार थेट 80 टक्के अनुदान, जाणून घ्या कसा मिळणार लाभ

केंद्र सरकारने राखीव कांदा आणणार बाजारात
केंद्र सरकार राखीव कांदा पुढच्या महिन्यापासून बाजारात आणणार आहे. डिसेंबरच्या शेवटपर्यंत पूर्णपणे बाजारात आणला जाणार आहे. याबाबत माहिती केंद्रीय नागरी पुरवठा मंत्री आश्विन कुमार चौबे यांनी राज्यसभेत दिली आहे. हा निर्णय कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी घेण्यात आला आहे. त्याचवेळी “नियंत्रित पद्धतीने कांदा बाजारात आणला जाईल,” असे देखील ते म्हणाले आहेत.

वाचा: Gold Rate | सोने खरेदीची उत्तम संधी! सणवाराच्या मुहूर्तावर सोन्याने गाठला नीच्चांक, जाणून घ्या आजचे नवे भाव

यंदाचा राखीव साठा
यंदा केंद्र सरकारकडून 2 लाख 50 हजार टन एवढा कांदा राखीव स्वरूपात ठेवण्याचं आला आहे. या कांद्याची खरेदी केंद्र शासनाने 2022 च्या रब्बी हंगामात केली आहे. बाजारात शेतमालाला (Agricultural Information) चांगला भाव मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात साठेबाजी केली जाते. हीच साठेबाजी रोखण्यासाठी सरकार वेगवेगळे उपाय करून नियंत्रण ठेवते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big hit to farmers! Central government has taken this big decision to control onion price hike

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button