ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Tur | केंद्र सरकारचा तूर उत्पादकांना मोठा फटका! देशात तूर आणि उडीद आयातीसाठी केला पुढील ‘इतक्या’ वर्षांसाठी करार

केंद्र सरकारने तुर उत्पादकांना पुन्हा केले निराश. सरकारने तीन देशांबरोबर तूर आणि उडीद आयातीचा (export) पाच वर्षाचा करार केलेला आहे.

Tur | देशात सध्या तूर (Tur) आणि उडीद (Black Gram) आयातीची गरज नसतानाही सरकारने हा दीर्घ कालावधीसाठी निर्णय घेतला आहे. सरकारने म्यानमार , मोझांबिक व मालावी या देशांसोबत तुर आयातीचा पाच वर्षाचा करार केला आहे. या करारानुसार दरवर्षी देशात साडेतीन लाख टन तुर आणि दोन लाख टन उडीद आयात होणार आहे. या कराराचा कालावधी 2021-22 ते 2025-26 असा आहे.

वाचा: Yojana | सुकन्या समृद्धी योजनेत ‘हा’ मोठा बदल! वाचा नव्या बदलामुळे फायदा होणार की तोटा?

तुर आयात
देशात या करारानुसार म्यानमारमधून दरवर्षी अडीच लाख टन उडीद व एक लाख तुर आयात केली जाणार आहे. मालवी मधून 50 हजार टन तुर तसेच मोझांबिक मधून दोन लाख टन तुर आयात होणार आहे.

वाचा: Onion Rate | शेतकऱ्यांना मोठा फटका! कांदा दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

डाळीचे दर नियंत्रणात..
“देशात महागाई वाढते आहे म्हणून डाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हा करार केला आहे” असे सरकारने स्पष्ट केले. या कराराचा परिणाम यावर्षी तूर आणि उडीद दरात नक्की होईल. परिणामी खरीपात तुरीची लागवड कमी होताना दिसत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big decision of the central government! Contract for next five years for import of Tur and Udid in the country

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button