ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
पशुसंवर्धन

lumpy skin Disease | पशुपालकांनो काळजी घ्या! जनावरांमध्ये पसरतोय ‘हा’ विषाणू, आतापर्यंत 999 जनावरे दगावली

कोरोना व्हायरस कुठे जात नाही तोपर्यंतच मंकीपॉक्सचे (Monkeypox) संकट जगावर आले आहे.

lumpy skin Disease | आता अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनासारखा (Corona) आणखी एक संसर्गजन्य विषाणू वेगाने पसरत आहे. लम्पी स्किन डिसीज (lumpy skin Disease) नावाच्या या आजारामुळे गाई-म्हशी मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम दुभत्या जनावरांवर (Dairy animals) दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत या विषाणूमुळे शेकडो जनावरांचा मृत्यू झाला आहे.

वाचा: Guar Farming | शेतकऱ्यांनो खरिपात करा ‘या’ पिकाची लागवड अन् करा लाखोंची कमाई, जाणून घ्या पीक व्यवस्थापन

प्राणी आजारी असताना ‘ही’ लक्षणे दिसतात
भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, बरेलीचे पशु रोग संशोधन आणि निदान केंद्राचे सहसंचालक म्हणतात. जनावरांना खूप ताप येतो, डोके आणि मानेच्या भागात खूप वेदना होतात. या काळात जनावरांची दूध देण्याची क्षमताही कमी होते. आतापर्यंत हजारो जनावरांमध्ये हा रोग आढळून आला आहे. तर 999 जनावरे दगावली आहेत. तसेच, 37 हजारांहून अधिक संक्रमित जनावरांवर उपचार सुरू आहेत. याचा परिणाम शेतीला (Agriculture) जोडधंदा असलेल्या पशुपालन व्यवसायावर होत आहे.

वाचा: Animal Husbandry | बाप रे! मिठाअभावी जनावरांना होतात ‘हे’ गंभीर आजार अन् दुधाची पातळीही घटते, जाणून घ्या सविस्तर

‘ही’ खबरदारी ठेवा
हा विषाणू डास आणि माश्या यांसारख्या रक्त शोषणाऱ्या कीटकांमुळे पसरतो. दूषित पाणी, लाळ आणि खाद्य यांमुळे जनावरांना हा आजार होतो. जेव्हा जेव्हा जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे दिसतात तेव्हा सर्वप्रथम तुमच्या आजारी गायी आणि म्हशींना वेगळे करा. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही वेगळी करा. जनावरे ठेवलेल्या ठिकाणी स्वच्छता ठेवा. असे न केल्यास आपल्या इतर प्राण्यांना या आजाराने ग्रासून आपला जीव गमवावा लागू शकतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Be careful ranchers This virus is spreading among animals 999 animals have died so far

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button