ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Eknath Shinde | 24 दिवसांत शिंदे सरकारची धडाकेबाज कामगिरी! हटवले तब्बल 538 शासन निर्णय, एकदा वाचाच…

राज्यात अवेळी सत्ताबदल झाली. आता मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेंच्या हाती आले आहे.

Eknath Shinde | एकनाथ शिंदे सरकारमध्ये अद्याप मंत्रिमंडळ (Cabinet) विस्तार झाला नसला, तरी राज्य सरकारकडून प्रशासकीय पातळीवर काम जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या शपथविधीच्या पहिल्या 24 दिवसांत 538 जीआर (Government Resolution) काढण्यात आले आहेत.

महाविकास आघाडी सरकारची मंजूर कामेही स्थगित
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारनेही महाविकास आघाडी सरकारची (Government) काही मंजूर कामे स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचे शिंदे सरकारचे म्हणणे आहे, त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने हा जीआर बेकायदेशीर ठरवून रद्द केला.

वाचा: DPR | आता शेतकऱ्यांना थेट पाहता येणार कांदा चाळीसह ‘या’ प्रकल्पांचा डीपीआर, जाणून घ्या डीपीआर आणि प्रक्रिया

जीआर 50 टक्के वेगाने जारी
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या तुलनेत शिंदे-फडणवीस सरकारने हे जीआर 50 टक्के वेगाने जारी केले होते. बहुतांश जीआर सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, सामान्य प्रशासन विभाग, जलसंपदा विभाग, महसूल व वन विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे आहेत.

वाचा: lumpy skin Disease | पशुपालकांनो काळजी घ्या! जनावरांमध्ये पसरतोय ‘हा’ विषाणू, आतापर्यंत 999 जनावरे दगावली

24 दिवसांतील विभागीय निर्णय

  • ग्रामविकास विभाग : 22 शासन निर्णय
  • कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय : 22
  • उच्च व तंत्रशिक्षण : 21
  • गृह विभाग : 20
  • आदिवासी विभाग : 19
  • मृद व जलसंधारण : 17
  • सामाजिक न्याय व विशेष साहाय्य : 14
  • सहकार, पणन व वस्त्रोद्योग :13
  • सार्वजनिक बांधकाम :13
  • कौशल्य विकास व उद्योजकता : 12
  • महिला व बालकल्याण विभाग : 10५

हटवलेले जीआर

  • सार्वजनिक आरोग्य 73
  • पाणीपुरवठा व स्वच्छता 68
  • शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 43
  • सामान्य प्रशासन विभाग 34
  • जलसंपदा विभाग, महसूल व वन विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य (3) – प्रत्येकी 24

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button