ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Salokha Yojana | 12 वर्षांचा वाद मिटणार एका झटक्यात! राज्य शासनाची ‘सलोखा योजने’ तून मिळवा जमिनीचा ताबा आणि नोंदणीमध्येही सवलत

Salokha Yojana | महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘सलोखा योजना’ नावाची नवीन योजना (Salokha Yojana) सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश शेतजमिनीच्या ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमधील वाद मिटवणे आणि समाजामध्ये सलोखा निर्माण करणे हा आहे.

योजनेचे फायदे:

शेतजमिनीच्या ताबा आणि वहिवाटीबाबत वाद मिटवणे

नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्कात सवलत

न्यायालयातील वादांची संख्या कमी करणे

भूमाफियांचा हस्तक्षेप टाळणे

शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण करने

पात्रता:

शेतजमिनीची अदलाबदल किमान 12 वर्षे पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे.

योजना फक्त शेतजमिनीसाठी लागू आहे.

अर्ज कसा करावा?

  • तलाठ्याकडे साध्या कागदावर अर्ज करा
  • अर्जात सर्व्हे नंबर, चतु:सीमा गट नंबर आणि इतर आवश्यक माहिती द्या
  • पंचनाम्याच्या वेळी 2 सज्ञान साक्षीदारांची उपस्थिती आवश्यक
  • दोन्ही गटातील सर्व सहभागी शेतकऱ्यांची दस्त नोंदणीसाठी संमती आवश्यक

अर्ज कुठे करावा?
जवळच्या तलाठ्याच्या कार्यालयात जाऊन साध्या कागदावर शेतकरी अर्ज करू शकतात. 2 वर्षांसाठी सलोखा योजना लागू राहणार आहे.

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button