ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Market Rates | पणजी: उन्हाळ्याचा तीव्र तडाखा आता भाज्यांवरही दिसून येत आहे. पणजी बाजारात वालपापडी २४० रुपये प्रति किलोपर्यंत तर मिरची १२० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशावर बोजा वाढला आहे.

लिंबूही महागले:

उन्हाळ्यामुळे लिंबूही महागले आहेत. बाजारात मोठे लिंबू १० रुपये प्रति लिंबू आणि मध्यम आकाराचे लिंबू ५० रुपयांना ७ ते ८ मिळत आहेत.

वाचा: Incentive Subsidy | अर्रर्र..! प्रोत्साहन अनुदानासाठी तब्बल 8.5 लाख शेतकरी अपात्र; या यादीत तुमचं नाव तर नाही ना?

भाज्यांच्या दरात वाढ:

लिंबू महागल्यावर आता भाज्यांवरही वाढत्या तापमानाचा परिणाम दिसून येत आहे. गोव्यात बेळगाव आणि कोल्हापूर येथून भाजी आयात केली जाते. सध्या तेथील घाऊक बाजारात भाज्या महागल्या आहेत आणि त्याचा थेट परिणाम पणजीतील किरकोळ बाजारातील भाजी दरांवर होत आहे.

वाचा: Result | दहावी आणि बारावीचा निकाल मे महिन्यात! ‘या’ तारखेला बारावी आणि दहावीचा निकाल होणार जाहीर

वालपापडी आणि मिरचीचा भाव:

वालपापडीचा दर साधारणता ८० ते १०० रुपये प्रति किलो इतका असतो. मात्र अचानक त्याच्या दरात वाढ होऊन तो थेट २४० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. तर बारीक हिरवी मिरची ३० रुपये प्रति पाव (म्हणजेच १२० रुपये प्रति किलो) या दराने मिळत आहे.

उकाड्यामुळे इतर भाज्याही महागू शकतात:

पणजीतील भाजी विक्रेत्यांनी सांगितले आहे की, उकाडा असाच कायम राहिला तर इतर भाज्यांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button