ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्याबाजार भाव

Market Price | तुरीचे दर तेजीत! सोयाबीन, कापसाच्या किंमतीत बदल; गव्हाचे भाव टिकून, कांद्यावर दबाव कायम, पाहा आजचे ताजे बाजारभाव

Market Price | सोयाबीन
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात (Market Price) मोठी नरमाई आली आहे. सोयाबीनचा भाव ११.३७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर आहे. सोयापेंडचा भाव ३४० डाॅलर आहे. देशातील प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ७५० ते ४ हजार ९०० रुपये. बाजार समित्यांमधील भाव ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपये. पुढील काही आठवडे चढ-उतार राहतील.

कापूस:
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नरमाई आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खरेदीतील भाव ९० सेंट प्रतिपाऊंड आहे. देशातील वायदे ५७ हजार ५०० रुपये आहेत. बाजार समित्यांमध्येही कापसाच्या भावातील नरमाई सुरूच आहे. देशातील बाजारात आजही कापसाला सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ६०० रुपये आहे. आणखी काही आठवडे चढ-उतार दिसू शकतात.

तुरी:
तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा. देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी ११ हजार रुपये. देशभरातील बाजारातील सरासरी भाव १० हजार ते ११ हजार रुपये. घटती आवक आणि चांगला उठाव. तुरीच्या भावातील तेजी कायम राहील.

वाचा: दूध उत्पादकांसाठी गोड बातमी! उन्हाळ्यामुळे दुधाचे दर वाढणार; लगेच वाचा गुडन्यूज

गहू:
देशातील बाजारात गव्हाचे भाव सध्या टिकून आहेत. बाजारातील गव्हाची आवक सरासरीपेक्षा कमी. उत्पादकतेला मोठा फटका. मागील महिनाभरात गव्हाचे भाव पुन्हा सुधारले. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपये. हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात.

कांदा:
कांद्याच्या भावावरील दबाव कायम. बाजारातील आवक कमी असूनही भाव वाढत नाहीत. सरकारची निर्यातबंदी आणि इतर धोरणांचा दबाव. सध्या कांदा भाव १००० ते १४०० रुपये. देशातील कांदा उत्पादनही यंदा घटले. ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत राहू शकते.

हेही वाचा: केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार! आता किराणा दुकानात सर्दी-खोकल्याची औषधे मिळणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button