ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Tur Rate | तुर उत्पादकांची चांदी! किमान दर पोहोचला थेट ‘इतक्या’ हजारांवर, पाहा किती मिळतोय भाव?

Tur Rate | बाजारात दर्जेदार तुरीच्या मालाची कमतरता निर्माण झाल्याने तुरीच्या दरात (Tur Rate) पुन्हा तेजी आली आहे. गेल्या आठवड्यात तुरीचा दर साडेअकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी (ता. ५) येथील बाजारात तुरीला (Tur Price) किमान ९ हजार आणि कमाल ११ हजार ७४५ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. सरासरी दर १० हजार ८०० रुपये होता, तर वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत तुरीला १२ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री झाली.

मार्च महिन्याच्या अखेरीस व्यवहार आटोपल्याने बाजार समित्या पूर्वपदावर येत आहेत. नव्या आर्थिक (Financial) वर्षाची सुरुवातच तुरीच्या दरातील वाढीने झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून साडे दहा ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल असलेला दर आता ५०० ते ६०० रुपयांनी वाढला आहे. कारंजा बाजार समितीत तर तुरीला १२ हजार रुपये प्रति क्विंटलचा उच्चांक गाठला आहे.

दरवाढीमागे दर्जेदार तुरीच्या मालाची कमी आवक हे प्रमुख कारण आहे. मार्चपर्यंत बाजारात मिश्र स्वरूपाच्या तुरीची आवक होत होती. आता बाजारात येणाऱ्या तुरीमध्ये ३० टक्केच माल दर्जेदार आहे, तर उर्वरित ७० टक्के माल दुय्यम दर्जाचा आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या तुरीला चांगला भाव मिळत आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

डाळीसाठी लागणारी दर्जेदार तूर कमी प्रमाणात बाजारात येत आहे. चांगल्या देशी तुरीचा तुटवडा हे दरवाढीमागील प्रमुख कारण आहे. तसेच तुरीची आवकही कमी होत आहे. मागणी अधिक असताना माल मिळत नसल्याने उद्योग जगताकडेही पूर्वीचा स्टॉक शिल्लक राहिलेला नाही. यामुळे तुरीच्या दरात तेजी आल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

या हंगामात सुरुवातीला तुरीच्या दरात घसरण झाली होती आणि सरासरी दर आठ ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला होता. यंदा तुरीचे अपेक्षित उत्पादन आले नाही. काही शेतकऱ्यांनी तुरीची साठवणूक केली होती. आता दर वाढू लागल्याने हा साठवलेला माल बाजारात येण्याची शक्यता आहे. यामुळे तुरीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button