ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Onion Rate | कांद्याच्या दरात पुन्हा घसरण? सरकारची कांदा खरेदी शेतकऱ्यांसाठी दिलासा की नवा फटका?

Onion Rate | कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. केंद्र सरकारने 31 मार्चनंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार आता 5 लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करणार आहे. मात्र, यामुळे पुन्हा कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

कमी दरात कांदा खरेदी:

केंद्र सरकार पुढील दोन-तीन दिवसांत कांदा खरेदीला सुरुवात करणार आहे. शेतकऱ्यांकडून 5 लाख मेट्रीक टन रब्बी कांदा खरेदी (Onion Rate) करण्यात येणार आहे. सध्या निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर घसरले आहेत. अशातच सरकारने संधी शोधत कमी दरात या कांद्याची खरेदी केली जाणार आहे. याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या कांद्याला बाजारात 800 ते 1200 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. तर काही ठिकाणी त्यापेक्षा देखील कमी दर मिळत आहे. कांदा निर्यातबंदी होण्याच्या आधी शेतकऱ्यांचा कांदा 4000 रुपये प्रतिक्विंटलवर गेला होता. मात्र, निर्यातबंदी लागू केल्यापासून कांद्याचे दर घसरत आहेत. याचा मोठा फटका बळीराजाला बसत आहे.

वाचा| Tukadebandi Kayada | तुकडेबंदी कायद्यात सुधारणा! लगेच जाणून घ्या जमिनीची खरेदी-विक्री नवी सोपी प्रक्रिया

शेतकऱ्यांना कसा बसणार फटका?

  • सध्या बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत. कारण भारतीय कांदा बाहेरच्या देशात जात नाही. त्यामुळे देशातला कांदा देशातच राहतोय, त्यामुळे दरात घसरण होतेय.
  • सरकार आता 5 लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करणार आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण, सध्या सरकार कमी दरात कांदा खरेदी करणार आहे.
  • हा खरेदी केलेला कांदा सरकार स्टॉक करणार आहे.
  • ज्यावेळी बाजारात कांद्याचे दर वाढतील, त्यावेळी सरकार हा स्टॉक केलेला कांदा बाहेर काढेल.
  • हा कांदा बाहेर काढला की आपोआपच कांद्याचे दर पडतील. कारण बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याचे आवक वाढेल त्याचा परिणाम दरांवर होईल.

शेतकऱ्यांची नाराजी:

31 मार्चनंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवण्याच्या निर्णयावर शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी निर्यातबंदी त्वरित उठवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

काय आहे पुढचा मार्ग?

  • सरकारने कांदा निर्यातबंदी त्वरित उठवणे गरजेचे आहे.
  • शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी सरकारने हमीभाव योजनेचा लाभ देणे गरजेचे आहे.
  • शेतकऱ्यांसाठी कांदा साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

Web Title |Onion Rate | Onion prices fall again? Government’s purchase of onion relief for farmers or a new blow?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button