ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Supreme Court Dicision | सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! आता खटल्यांची माहिती मिळणार व्हॉट्सॲपद्वारे, वाचा सविस्तर

Supreme Court Dicision | सर्वोच्च न्यायालयाने आज डिजिटायझेशनच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, संबंधित खटल्याची माहिती व्हॉट्सॲपद्वारे विधिज्ञांना पाठविण्याची घोषणा केली आहे. यामुळे न्यायालयीन (Supreme Court Dicision) कामकाजाची प्रक्रिया सुलभ होईल आणि कागदपत्राची बचत होईल.

व्हॉट्सॲप कनेक्टिव्हिटी:

  • ‘इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी (आयसीटी) सर्व्हिसेस’सोबत व्हॉट्सॲप जोडण्यात येईल.
  • वरिष्ठ अधिकाऱ्याचा व्हॉट्सॲप क्रमांक शेअर केला गेला आहे.
  • नोंदणीकृत वकील आणि याचिकाकर्त्यांना खटल्याची माहिती व्हॉट्सॲपवर मिळेल.
  • बार कौन्सिलच्या सदस्यांनाही रजिस्ट्रीद्वारे संदेश पाठविले जातील.
  • निकाल प्रसिद्ध झाल्यावर त्याचा तपशील व्हॉट्सॲपवर पाठविला जाईल.

वाचा: आई वडिलांचा सांभाळ करा! अन्यथा मुलाच्या नावावरील मालमत्तेचे खरेदीखत आणि बक्षिसपत्र होईल रद्द, जाणून घ्या महत्वाचा कायदा?

फायदे:

  • न्यायालयाचा वेळ आणि कागदाची बचत
  • अधिक लोकांपर्यंत कोर्ट पोहोचणे सोपे
  • दुर्गम भागातील लोकांनाही सहज ॲक्सेस
  • ‘क्लाउड’वर सर्व काही उपलब्ध
  • न्यायालयाच्या सेवा ‘मेघराज क्लाउड २.०’ वर उपलब्ध

प्रतिक्रिया:

  • सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि ते क्रांतिकारी पाऊल असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! केळी-आंब्यासह ‘या’ 20 पिकांची वाढवणार निर्यात; शेतकरी होणार मालामाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button