ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

1 May Rule Change | नवा महिना, नवे नियम! 1 मेपासून तुमच्या खिशावर परिणाम करणारे बदलणार ‘हे’ नियम?

1 May Rule Change | मे महिन्याच्या सुरुवातीपासून देशात अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. या बदलांचा (1 May Rule Change) थेट परिणाम सामान्या नागरिकांवर होणार आहे. खासगी बँका, गॅस सिलेंडर, महत्त्वाची कागदपत्रे आणि मंदिरांमधील दर्शनासाठी नियमांमध्ये बदल होत आहेत. या बदलांचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार ते जाणून घेऊया.

गॅस सिलेंडर: दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होत असतो. मे महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाची कागदपत्रे: महाराष्ट्र सरकारने 1 मे 2024 पासून महत्त्वाच्या कागदपत्रांवर आईचे नाव अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. जन्म प्रमाणपत्र, शालेय दस्तऐवज, मालमत्तेची कागदपत्रे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांसारख्या कागदपत्रांवर आता आईचे नाव असणे बंधनकारक आहे.

बाबा महाकाल मंदिर: 1 मे पासून उज्जैन मधील बाबा महाकाल मंदिरातील भस्म आरतीसाठी बुकिंग 15 दिवसांऐवजी आता तीन महिने अगोदर करता येईल. भाविक एका मोबाईल क्रमांक आणि आधार कार्डवरून तीन महिन्यात एकदाच बुकिंग करू शकतील.

आयडीएफसी फर्स्ट बँक: 1 मे पासून आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी बिल भरल्यास जास्त पैसे द्यावे लागतील. वीज, गॅस, इंटरनेट, केबल आणि पाणीपट्टी यांसारख्या बिलांचा यात समावेश आहे.

ICICI बँक: 1 मे पासून ICICI बँकेने डेबिट कार्डच्या वार्षिक शुल्कात बदल केले आहेत. शहरी भागात डेबिट कार्डसाठी 200 रुपये आणि ग्रामीण भागात 99 रुपये वार्षिक शुल्क लागू असेल.

Yes बँक: 1 मे पासून Yes बँकेने सेव्हिंग अकाउंटशी संबंधित अनेक सेवांमध्ये बदल केले आहेत. अकाउंट प्रो मॅक्ससाठी 50 हजार रुपयांचा मिनिमम अॅव्हरेज बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे.

वाचा: बँकांमध्ये 12 दिवसांचा ताळाबंद! मे महिन्यात तुमची बँकिंग व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो

या बदलांचा तुमच्यावर काय परिणाम होईल?

  • गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्यास तुमच्या घरगुती खर्चात वाढ होईल.
  • महत्त्वाच्या कागदपत्रांवर आईचे नाव नसल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
  • बाबा महाकाल दर्शनासाठी आधीच बुकिंग केल्याने तुम्हाला वेळेचे नियोजन करता येईल.
  • बँक शुल्कात वाढ झाल्याने तुमच्या खर्चात थोडी वाढ होईल.
  • मे महिन्यापासून अनेक महत्त्वाचे बदल होत आहेत. या बदलांचा तुमच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होईल याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.

हेही वाचा: कर्क, तूळ आणि मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक फायद्याचा, वाचा आज तुम्हाला काय-काय मिळणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button