ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Tukadebandi Kayada | तुकडेबंदी कायद्यात सुधारणा! लगेच जाणून घ्या जमिनीची खरेदी-विक्री नवी सोपी प्रक्रिया

Tukadebandi Kayada | महाराष्ट्र सरकारने तुकडेबंदी कायद्यात सुधारणा (Tukadebandi Kayada) करून जमिनीची खरेदी-विक्री अधिक सोपी बनवली आहे. 14 मार्च 2024 रोजी राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या या सुधारणा 14 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारुपावर आधारित आहेत.

सुधारित कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी:
विहिरी, शेतरस्ते आणि घरकुलासाठी जमिनीच्या हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी एका वर्षासाठी वैध असेल.
अर्जदाराच्या विनंतीनुसार पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ मिळू शकते.
मंजुरी मिळालेल्या जमिनीचा वापर त्याच कारणासाठी करावा लागेल. अन्यथा मंजुरी रद्द मानली जाईल.
‘फॉर्म नमुना-बारा’ द्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल.

वाचा |तीन गुंठ्यात ७५ पिके! हवामान बदलाशी लढण्याचा यशस्वी प्रयोग!

अर्ज कसा करावा?
राजपत्रात ‘फॉर्म नमुना-बारा’ मध्ये अर्जाचा नमुना दिला आहे. अर्जात जिल्हा, विषय, अर्जदाराचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, जमिनीचे वर्णन, विहिरीचा व्यास (जर विहिरीसाठी अर्ज असेल तर), शेतरस्त्याची लांबी, रुंदी आणि क्षेत्रफळ (जर रस्त्यासाठी अर्ज असेल तर), आणि लाभार्थी आणि योजनेचा तपशील (जर घरकुल योजनेसाठी अर्ज असेल तर) द्यावा लागेल. अर्जदाराने अर्जावर सही करणे आवश्यक आहे.

या सुधारणांमुळे काय फायदे होईल?
जमिनीची खरेदी-विक्री अधिक सोपी आणि जलद होईल.
शेती आणि घरकुल बांधकामासाठी जमिनीची उपलब्धता वाढेल.
जमिनीच्या तुकडेबंदीमुळे निर्माण होणारे कायदेशीर वाद कमी होतील.
या सुधारणांमुळे जमिनीची अत्यधिक विभागणी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतीच्या उत्पादकतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Web Title |Tukadebandi Kayada | Amendment of the fragmentation law! Know immediately the new easy process of buying and selling land

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button