ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शासन निर्णय

Agriculture | तुकडेबंदी कायद्यात मोठा बदल! आता ‘अशा’प्रकारे होणारं जमीनीची खरेदी विक्री, लाखो शेतकऱ्यांची मिटणार चिंता

Agriculture | आता जमिनीच्या खरेदी विक्रीबाबत लाखो शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे. आता बागायती आणि जिरायती जमिनीच्या (Arable land) खरेदी व विक्रीवरील क्षेत्राचे असणारे निर्बंध आता उठणार आहे. त्याचमुळे लाखो शेतकऱ्यांना (Agriculture) दिलासा मिळणार आहे. याबाबत मे 2022 मध्येच एक शासन निर्णय घेण्यात आला होता. ज्यामध्ये काही अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. चला तर मग तुकडेबंदी कायद्यात (Partition Act) नेमका काय बदल करण्यात आला आहे ते जाणून घेऊयात.

वाचा: कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! यंदा कापूस राहणार तेजीत, मिळणार ‘इतका’ भाव

तब्बल 70 वर्षानंतर कायद्यात बदल
महाराष्ट्रामध्ये 1947 साली तुकडेबंदी हा कायदा लागू करण्यात आला होता. या कायद्यानुसार राज्यामध्ये जमिनीचा तुकडा करून खरेदी विक्री व्यवहार करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. यांनतर या 1950 मध्ये काही जिल्ह्यांत जिरायतीसाठी 80 गुंठे, तर बागायतीसाठी 40 गुंठे असं तुकड्याचं क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. तेव्हापासून हा नियम अजूनही चालूच होता. ज्यामध्ये यात बदल करण्यात आला आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीक नुकसानीचे 1 हजार 106 कोटी आले, ‘या’ तारखेपासून होणार खात्यात जमा

कसा होईल जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार?
आता पुन्हा या कायद्यात बदल करून तुकडेबंदी-तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा- 1947 मध्ये बदल करून जिरायत जमीनीच्या खरेदी आणि विक्रीसाठी किमान 20 गुंठे व बागायती जमिनीसाठी 5 गुंठ्याची मर्यादा असणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महसूल विभागाकडून सरकारला सादर करण्यात आला आहे. यावर आता लवकरच शासन निर्णय घेण्यात येऊ शकतो.

शेतकऱ्यांना होणार फायदा
तुकडेबंदी कायद्यात अशाप्रकारे बदल झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण पूर्वी 80 गुंठे बागायती जमीन आल्यावरच जमिनीचा व्यवहार करता येत होता. ज्यात बदल करून तो 20 गुंठे इतका करण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही अडचणी निर्माण होत होत्या. कारण शेतकऱ्यांना विहिरी किंवा रस्त्यांसाठी 5 ते 6 गुंठे जमिनीची विक्री करायची असल्यास ती करता येत नव्हती. त्यामुळे अशा जमिनीचे व्यवहार ठप्प झाले होते. आता हा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी आपल्या बागायती जमिनीची विक्री व खरेदी 5 गुंठ्यांत करू शकणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहेत. तसेच जिरायती जमिनीसाठी 20 गुंठे ही मर्यादा आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: A big change in the fragmentation law! Now the purchase and sale of land will be done in this way, the worry of lakhs of farmers will disappear

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button