ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शासन निर्णय

Electricity For Farmers | राज्य सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी देणारं दिवसाही वीज; जाणून घ्या सविस्तर…

Electricity For Farmers | शेतकऱ्यांना शेती करताना येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे दिवसा वीज. शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त रात्रीची वीज (Electricity For Farmers) दिली जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांनी रात्री अपरात्री शेतीतील पिकाला पाणी द्यायला जावे लागते. यामुळे सर्पदंश तसेच झोप न मिळाल्याने शारीरिक समस्या देखील शेतकऱ्यांना उद्भवू शकतात. म्हणूनच आता राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज (Electricity For Farmers) देण्यात येणार आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा मिळावी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना (Mukhyamantri Solar Agriculture Channel Scheme) सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेच्या माध्यमातून शासकीय तसेच खासगी जमिनीवर सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना जमिनीचे भाडे देखील मिळणार आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

राज्य सरकारसाठी महत्वाकांक्षी योजना
खरं तर, राज्य सरकारची ही योजना प्रचंड महत्वाकांक्षी आहे. ज्यासाठी लवकरच राज्यस्तरावर 4 ते 5 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीची निविदा काढण्यात येणार आहे. याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे.

Web Title: Big decision of the state government! Daytime electricity for farmers; Know more…

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button