ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्याबाजार भाव

Wheat Price | केंद्र सरकारचं मोठा निर्णय! केंद्राची राज्य सरकारांना होणारी गहू आणि तांदळाची विक्री बंद, थेट दरावर होणार परिणाम

Wheat Price | आता केंद्र सरकारने गहू आणि तांदळाच्या विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्याचा परिणाम थेट गहू गव्हाची (Wheat Price) आणि तांदळाच्या दरावर होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने राज्य सरकारांना केली जाणार गव्हाची (Wheat Price) आणि तांदळाची विक्री बंद करण्याचे निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार हा निर्णय घेऊन मोठ्या प्रमाणात होणारी भाव वाढ रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबतचे महत्त्वपूर्ण निर्देश केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी घेतला नियंत्रण
नुकतेच केंद्र सरकारकडून भारतीय अन्न महामंडळाला राज्य सरकारांना खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदूळ व गहू (Us Wheat Price) विक्री बंद करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. खरं तर गव्हाच्या (Gehun Ka Rate) आणि तांदळाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. ज्याचा फटका राज्य सरकारांना बसणार आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

काय दिलेत आदेश?
“राज्य सरकारांसाठी खुल्या बाजार विक्रींतर्गत गहू आणि तांदूळ विक्री बंद करण्यात आली आहे. परंतु, ईशान्येकडील राज्ये, दुर्गम व डोंगराळ राज्ये, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, नैसर्गिक आपत्तींना तोंड देत असलेल्या राज्यांत 3 हजार 400 रुपये प्रति क्विंटल इतक्या दराने खुल्या बाजार विक्री योजनेतून गहू आणि तांदळाचा पुरवठा सुरू ठेवण्यात येईल, असा आदेश भारतीय अन्न महामंडळाने जारी केला आहे. गेल्या वर्षात तांदळाच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर केवळ गेल्या एका महिन्यात तब्बल 8 टक्क्यांनी वाढ झाली यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Web Title: Central government’s big decision! Cessation of central sale of wheat and rice to state governments will directly affect prices

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button