ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Agricultural Consultancy | अर्रर्र..! राज्यात उष्णतेची तीव्र लाट; शेतकऱ्यांनो त्वरित जाणून घ्या कधी करावी पेरणी?

Agricultural Consultancy | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार,
पुढील पाच दिवस दिनांक 17 ते 21 जून आकाश निरभ्र ते आंशिक ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
दिनांक 17, 18 व 19 जून रोजी तुरळक ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.
तर दिनांक 20 व 21 जून रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेची (Agricultural Consultancy) लाट राहण्याची शक्यता आहे. चला तर शेतकरी मित्रांनो हवामान आधारित कृषी सल्ला (Agricultural Consultancy) जाणून घेऊयात.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

कृषी सल्ला
शेतकरी बांधवांनी 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. मध्यम व विस्तारित स्वरूपाचा
पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. वाढत्या तापमानाचा व उष्णतेची लाट राहण्याचा
अंदाज लक्षात घेता, शेतीमधील महत्वाची कामे सकाळी 11 वाजता पूर्वी करण्यास प्राधान्य द्यावे. पावसाळ्यात
शेतातील पाणी जागेवरच मुरविण्यासाठी तसेच अवघावासोबत मौल्यवान मातीचा थर वाहून जाऊ नये म्हणून
जमिनीची मशागत (नांगरणी, वखरणी) करताना मुख्य उतारला आडवी किंवा समतल रेषा काढून या रेषेला समांतर करावी. सद्यस्थितीमध्ये असणारे तापमान लक्षात घेता, उन्हाळी भाजीपाला पिकाचे उष्णतेपासून संरक्षण
करण्यासाठी ग्रीन शेड नेटचा वापर करावा.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

फळबागांची काळजी
नवीन लागवड केलेल्या 1 ते 4 वर्ष वयाच्या फळझाडांच्या आळ्यात
पाला पाचोळा, गव्हांड्याचे आच्छादन करावे. लहान रोपांवर पऱ्हाटी किंवा तुऱ्हाटीचे छप्पर करावे. माती परीक्षणासाठी मातीचे नमुने काढून ते अधिकृत किंवा शासकीय मृदा परीक्षण प्रयोगशाळेत योग्य शुल्कासह पाठवून माती परीक्षण अहवालानुसार पिक परत्वे कृषी निविष्ठा चे नियोजन करावे. शेतकरी बांधवांनी शिफारशीतील
बियाणे व बीजप्रक्रियेसाठी साठी लागणारी बुरशीनाशके आणि जीवाणू खताची उपलब्धतता करून ठेवा.

Web Title: Severe heat wave in the state; Farmers know immediately when to sow

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button