ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

School Holidays | महाराष्ट्रात २ मेपासून राज्य मंडळाच्या शाळांना उन्हाळी सुट्टी, पाहा किती तारखेला भरणार शाळा?

School Holidays | महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने आज गुरुवारी (१८ एप्रिल) एका आदेशातून राज्यभरातील सर्व राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना २ मेपासून (School Holidays) उन्हाळी सुट्टी जाहीर केल्याची माहिती दिली आहे. तर आगामी शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होईल, असेही शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

या आदेशानुसार, विदर्भातील शाळांना ३० जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. जून महिन्यातील विदर्भातील तीव्र उष्णतेमुळे तेथील शाळा १ जुलैपासून सुरू होतील, असेही शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

इयत्ता पाचवी आणि आठवीची फेरपरीक्षा १५ जूनपूर्वी:
इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदा शालेय परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत आणि त्यांचा निकाल १ मे रोजी जाहीर केला जाईल. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होण्यापूर्वी १० जूनपूर्वी फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल. या फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे, अन्यथा त्यांना त्याच वर्गात पुन्हा बसावे लागेल.

वाचा: केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार! आता किराणा दुकानात सर्दी-खोकल्याची औषधे मिळणार

इतर मंडळांच्या शाळांसाठी सूचना:
राज्य शिक्षण मंडळाने इतर मंडळांच्या शाळांनाही विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टीची तारखा निश्चित करण्याची सूचना दिली आहे. शाळांनी आपले वेळापत्रक आणि शैक्षणिक कार्यक्रम यांचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टीची तारखा निश्चित करावी, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेपासून सुटका मिळेल आणि ते सुट्टीचा आनंद घेऊ शकतील.

हेही वाचा: साठेखत म्हणजे काय? नोंदणीकृत साठेखताचे फायदे काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button