ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्यायोजना

Kharif Season | ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांदी, खरिप हंगामासाठी मिळणार थेट बांधावर खते-बियाणे

आता नुकतीच खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणे खरेदी (Purchase of seeds), खत खरेदी (Fertilizer purchase), मशागती (Cultivated) ,पेरणी (Sowing), लागवड (Planting) यांसाठी लगबग सुरू झाली आहे.

Kharif Season | शेतकरी आता शेतीच्या (Agriculture) कामामध्ये व्यस्त आहेत. शेतकऱ्यांवर आता सध्या शेतीच्या कामाचा प्रचंड ताण आहे. सरकार (Government) आणि कृषी विभाग (Department of Agriculture) देखील शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करत आहे. त्याचबरोबर आता कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना बियाणे खरेदी, खते खरेदी, यासाठी दुकानात जावे लागू नये यासाठी कृषी विभागाने एक आगळीवेगळी उपाययोजना केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात सरकारने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी काय उपाययोजना केली आहे.

शेतकऱ्यांना आता मिळणार…
सर्वच शेतकऱ्यांची खरीप हंगाम लागवडीसाठी लगबग सुरू आहे. त्यामुळे खते व बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाया जात आहे आणि शेतकऱ्यांची गैरसोय देखील होत आहे. त्यामुळे आता कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी पुढाकर घेत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बियाणे व खते थेट त्यांच्या बांधावर पोहोचवण्याचे नियोजन केले आहे. याचा 13 हजार 798 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

वाचा: PM Kisaan | तुम्हाला पीएम किसानचा 11 वा हप्ता मिळाला का? नसेल तर त्वरित करा ‘अशी’ तक्रार

यंदा खरीप हंगामात वाढ
वर्धा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन आणि तुर या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात येते. जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र हे मागच्या काही वर्षांपासून वाढताना दिसून येत आहे. त्याचप्रमाणे पाहायला गेलं, तर जिल्ह्यामध्ये 4 लाख 18 हजार 561 हेक्टरवर मागच्यावर्षी खरीप हंगामासाठी लागवड करण्यात आली होती. त्याचप्रमाणे या वर्षीच्या खरीप हंगाम पेरणी मध्ये वाढ झाली आहे. त्याचमुळे यंदा 4 लाख 37 हजार हेक्टरवर पेरणी करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

वाचा: पत्नीच्या नावाने उघडा ‘हे’ अकाउंट ; 5 हजारांच्या मासिक गुंतवणुकीवर मिळेल आयुष्यभर लाखोंमध्ये ‘पेन्शन’

शेतकऱ्यांना होणारं मोठा फायदा
शेतकऱ्यांना आता बांधावर बियाणे आणि खते मिळणार असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणत फायदा होणार आहे. कारण खते आणि बियाणे खरेदीसाठी गेल्यानंतर कृषी विभाग केंद्रावरील गर्दीला तोंड देणे टळणार आहे. त्याचबरोबर या वेळेत शेतकरी त्यांच्या शेतीतील इतर कामे करू शकणार आहेत. इतकचं नाही, तर शेतकऱ्यांचा खते व बियाणे शेतीत वाहून आणण्यासाठीचा वाहतूक खर्च देखील वाचणार आहे. त्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्याचबरोबर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांनी बांधावर खत व बियाणे योजनेंतर्गत कृषी निविष्ठांची खरेदी करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button