ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

PM Kisaan | पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! 12व्या हप्त्यासाठी ‘या’ अटी-नियमांची करावी लागणार पूर्तता

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वेळोवेळी सरकारकडून अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकीच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Prime Minister Kisan Sanman Nidhi Yojana) ही देखील अशीच योजना आहे.

PM Kisaan | या योजनेतून लाभार्थ्यांना 2 हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana 11th Installment) 11 वा हप्ता 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर (Farmer account) पाठवण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी (Farmer) या हप्त्याची वाट पाहत होते. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर 11वा हप्ता जमा झाला असून, सरकारने (Government) 12व्या हप्त्यामध्ये काही नियम व अटी (12th Installment Terms and Conditions) लागू केल्या आहेत. ज्या पूर्ण केल्याशिवाय शेतकऱ्यांना 12वा हप्ता मिळणार नाही. चला तर मग जाणून घेऊया सरकारने कोणत्या गोष्टी 12व्या हप्त्यासाठी अनिवार्य केल्या आहेत.

अटी व नियम
किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली आहे. कारण अनेक शेतकरी पात्र नसतानाही या योजनेचा लाभ घेत होते. त्याचमुळे या योजनेचा केवळ पात्र शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी सरकारने ई- केवायसी अनिवार्य केली आहे. ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 मे ठेवण्यात आली होती. आता शेतकऱ्यांना खूशखबर देत सरकारने ही मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. जे शेतकरी या तारखेपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत. त्यामूळे ते शेतकरी 12व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.

वाचाYojana | काय सांगता? ‘या’ योजनेंतर्गत मिळतेय शेत जमीन, जाणून घ्या पात्रता आणि…

एका वर्षात तीन हप्ते
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून वर्षभरात 6 हजार रुपये मिळतात. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये पाठवले जातात. योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे 1 एप्रिल ते जुलै दरम्यान पाठवले जातात. दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान येतो, तर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान सरकारद्वारे हस्तांतरित केला जातो.

वाचा: PM Kisaan | तुम्हाला पीएम किसानचा 11 वा हप्ता मिळाला का? नसेल तर त्वरित करा ‘अशी’ तक्रार

ई-केवायसी कशी करावी?

  • सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
  • आता इथे तुम्हाला Farmer Corner दिसेल, जिथे EKYC टॅबवर क्लिक करा.
  • आता एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च टॅबवर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरील क्रमांकावर OTP पाठवला जाईल.
  • सबमिट OTP वर क्लिक करा.
  • आधार नोंदणीकृत मोबाइल OTP प्रविष्ट करा आणि तुमचे eKYC केले जाईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button