ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

PM Kisan Yojana | तुम्ही ई-केवायसी केली का? नसेल तर चिंता करू नका, सरकारने ‘या’ तारखेपर्यंत केली मुदतवाढ

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक मोठी माहिती समोर आली आहे. आता शेतकऱ्यांची 11 व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

PM Kisan Yojana | आता पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांच्या खात्यात (Farmer account) येणारा 11 वा हप्ता 31 मे पर्यंत खात्यात पोहोचू शकतो. पीएम किसान योजना शेतकऱ्यांना 3 समान हप्त्यांमध्ये वार्षिक (Annual) 6000 रुपये रोख हस्तांतरण प्रदान करते. त्याचबरोबर यासाठी सरकारने (Government) ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ज्यासाठी 31 मे ही अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र यामध्ये आता सरकारने बदल करून शेतकऱ्यांना मुदत वाढवून दिली आहे.

11व्या हप्त्यासाठी ई-केवायसी अपडेट करणे आहे आवश्यक
केंद्र सरकार ई-केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख सतत पुढे ढकलत आहे. परंतु काही शेतकरी असे आहेत की त्यांना त्याची पर्वा नाही. यावेळी पीएम किसान योजनेचे पैसे कोणत्याही अडथळ्याशिवाय खात्यात यावेत, असे वाटत असेल तर ई-केवायसी ताबडतोब अपडेट करा. यापूर्वी ही ई- केवायसी करण्याची तारीख 31 मे पर्यंत दिली होती. आता सरकारने 31 जुलै 2022 पर्यंत शेतकऱ्यांना ई- केवायसी कळण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यास वेळ मिळणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती पीएम किसान पोर्टलवर pmkisan.gov.in देण्यात आली आहे.

वाचा: Subsidy | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांची यादी जाहीर

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी तपासावी?
पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव तपासण्यासाठी, सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा. येथे फार्मर्स कॉर्नरचा पर्याय दिसेल. यानंतर लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल. नवीन पृष्ठावर, तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव तपशील प्रविष्ट करा. त्यानंतर Get Report वर क्लिक करा. येथे तुम्हाला सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी मिळेल. त्यात तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

वाचा: Yojana | काय सांगता? केंद्र सरकार शेतकऱ्यांना ‘या’ योजनेंतर्गत देतंय तब्बल 15 लाख, त्वरित करा ‘असा’ अर्ज

चुकीची माहिती दिल्यास केले जातील पैसे वसूल
या योजनेंतर्गत नोंदणी करताना, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, पात्रता अटी पूर्ण करणाऱ्यांनीच त्यासाठी अर्ज करावा. जर एखादी व्यक्तीने पात्रता अटी पूर्ण केले नसेल आणि चुकीची माहिती देऊन पैसे मिळवले आहेत. त्यामुळे त्याला जी काही रक्कम मिळाली आहे, ती सर्व वसूल केली जाईल. याशिवाय त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचीही तरतूद आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button