ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Yojana | काय सांगता? केंद्र सरकार शेतकऱ्यांना ‘या’ योजनेंतर्गत देतंय तब्बल 15 लाख, त्वरित करा ‘असा’ अर्ज

भारतातील जवळपास 65 टक्के नागरिक हे शेती व्यवसाय करतात. शेतीतून त्यांचा उदरनिर्वाह होतो. शेती (Agriculture) करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात.

Yojana | पिकाची लागवड (Crop planting) करण्यास पैशांची कमतरता भासते यामुळेच शेतकरी पिक कर्ज (Crop loan) घेतात. मात्र अनेकदा पिकाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जाची परतफेड करू शकत नाहीत आणि ते कर्जबाजारी होतात. म्हणूनच सरकार (Government) शेतकऱ्यांसाठी सतत विविध योजना राबवत असत. तुम्हालाही शेतकरी योजनेचा लाभ मिळत असेल, तर आता तुमच्यासाठी आणखी एक मोठी बातमी आहे. केंद्र सरकार (Central Government) शेतकऱ्यांवर मेहरबान झाले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांचे कर्ज फेडावे यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आता सरकार शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय (Farming business) सुरू करण्यासाठी 15 लाख रुपये देत आहे. तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता ते जाणून घेऊयात.

‘या’ योजनेंतर्गत मिळणारं 15 लाख
शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सरकारने ‘पीएम किसान एफपीओ योजना’ (PM Kisan FPO Yojana) योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनेला 15 लाख रुपये दिले जाणार आहेत. नवीन कृषी व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकऱ्यांना एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे किंवा खते, बी-बियाणे किंवा औषधे खरेदी करणेही सोपे होईल.

वाचा: Subsidy | पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जून अखेरपर्यंत 50 हजारांचे अनुदान?

‘असा’ करा अर्ज

  • सर्व प्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
  • आता होम पेजवर FPO च्या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्ही ‘Registration’ या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर नोंदणी फॉर्म उघडेल.
  • आता फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरा.
  • यानंतर, तुम्ही स्कॅन केलेले पासबुक अपलोड करा किंवा चेक आणि आयडी प्रूफ रद्द करा.
  • आता तुम्ही सबमिट पर्यायावर क्लिक करा.

वाचा: Onion Rate | कांदा विक्रीतच होणार शेतकऱ्यांची बचत, आता बाजारात पोहोचणार ‘असा’ कांदा

याप्रमाणे करा लॉगिन

  • तुम्हाला लॉगिन करायचे असल्यास, सर्वप्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
  • यानंतर तुम्ही FPO च्या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्ही login च्या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्यासमोर लॉगिन फॉर्म उघडेल.
  • आता त्यात युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका.
  • याच्या मदतीने तुम्हाला लॉगिन करता येईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button