ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

PM Kisaan | तुम्हाला पीएम किसानचा 11 वा हप्ता मिळाला का? नसेल तर त्वरित करा ‘अशी’ तक्रार

पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी (Farmer) या हप्त्याची वाट पाहत आहेत.

PM Kisaan | मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजारांचा हप्ता पोहोचलेला नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत, तर थोडे थांबा. पीएम किसान सन्मान निधीचा (PM Kisan Nidhi Yojana) 11 वा हप्ता तुमच्या बँक खात्यावर पोहोचला नाही याबद्दल खात्री करा. तो का पोहोचला नाही आणि त्याबद्दल कशी तक्रार नोंदवाल हे जाणून घेऊया.

पीएम किसान योजना
पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम दर 4 महिन्यांनी तीन वेळा पाठवली जाते. यावेळी शेतकऱ्यांना 11 वा हप्ता म्हणून दोन हजार रुपये मिळाले आहेत. त्याचवेळी शेवटचा म्हणजेच 10 वा हप्ता केंद्र सरकारने 1 जानेवारी 2022 रोजी हस्तांतरित केला होता.

वाचा: Yojana | काय सांगता? ‘या’ योजनेंतर्गत मिळतेय शेत जमीन, जाणून घ्या पात्रता आणि…

11 वा हप्ता न मिळण्याचे कारण
जर तुम्ही संस्थात्मक शेतकरी असाल तुमच्या घरात कोणीतरी सरकारी नोकरी करत असेल, ज्यांचे पेन्शन रु. 10,000 पेक्षा जास्त आहे किंवा ITR दाखल करणारे लोक पात्र नाहीत. याशिवाय, तुम्ही लोकसभा, राज्यसभा, विधानसभा किंवा विधानपरिषदेचे माजी किंवा सध्याचे सदस्य असाल तरीही तुम्हाला 11 वा हप्ता मिळणार नाही. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी KYC ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्या शेतकऱ्यांना देखील 11 वा हप्ता मिळाला नाही.

कशी नोंदवाल तक्रार ?
• 11 व्या हप्त्याची पैसे जमा न झालेल्या शेतकऱ्यांनी 18001155266 या हेल्पलाईन नंबरवर फोन करून तक्रार नोंदवावी.
• त्याचबरोबर शेतकरी [email protected] किंवा [email protected] यावर ईमेल पाठवू शकतात.

वाचा: Yojana | 700 कोटींच्या गुंतवणूकीतून द्राक्ष-डाळिंबासाठी राबवण्यात येणार ‘ही’ योजना, जाणून घ्या काय होणार फायदा

हेल्पलाइन क्रमांकांबद्दल जाणून घ्या
PM किसान योजना हेल्पलाइन नंबर
PM किसान योजना टोल फ्री क्रमांक: 011-24300606
PM किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
PM किसान योजना ईमेल ID: [email protected]

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button