ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Cotton Rate | कापूस उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! नक्की कधी वाढणारं कापसाचे दर; जाणून घ्या एका क्लिकवर

Cotton Rate | सध्या बाजारात कापसाची विक्री सुरू आहे. तर देशामधील कापूस हंगाम सुरू होऊन जवळपास चार-पाच महिने होऊन गेले आहे. तर पहिल्या तीन महिन्यांत कापसाच्या दरामध्ये आपल्याला चढ-उतार पाहायला मिळाला होता. ज्यामुळे देशातील कापूस (Cotton Rate) उत्पादक शेतकरी चिंतेत पडला होता. मात्र, आता येत्या काही काळात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दराबाबत (Cotton Rate) दिलासा मिळतो की, नाही ही अतिशय महत्वाची बाब आहे. चला तर मग जाणून घेऊयात देशातील कापसाचे दर नेमके कधी सुधारतील.

वाचामक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

शेतकऱ्यांना दर सुधारण्याची आशा
आगामी काळात सुधारतील म्हणून शेतकऱ्यांनी जवळपास तीन-चार महिन्यांपासून कापसाची साठवणूक करून ठेवली आहे. परंतु साठवणूक केलेल्या कापसाला डस्ट माईट्स धोकाही होऊ शकतो. दिवस कापसाचे साठवून केल्यामुळे कापतात डस्ट माईट्स आढळून येतात. पण आगामी काळात भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला. पण हे दर नेमके कधी सुधारतील हे पाहुयात.

वाचाबाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?

‘असा’ मिळाला कापसाला भाव

  • नोव्हेंबर 2022– 8,461 रुपये प्रती क्विंटल
  • डिसेंबर 2022- 8,017 रुपये प्रती क्विंटल
  • जानेवारी 2023- 8,005 रुपये प्रती क्विंटल
  • फेब्रुवारी 2023 – 7,815 रुपये प्रती क्विंटल
  • मार्च 2023 – 7,580 रुपये प्रती क्विंटल

कधी वाढणार कापसाचे भाव?
सध्या कापसाला 7 हजार 500 ते 7 हजार 800 रुपये असा दर मिळत आहे. तर देशातील कापसाला साधारणतः एप्रिल महिन्यात चांगला दर मिळू शकतो. ज्याचं कारण म्हणजे बाजारातील कापसाची आवक कमी होईल आणि याचाच परिणाम पाहता कापसाच्या दाराला उभारी येईल, अस मत जनक्रंनी व्यक्त केले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Important news for cotton growers! When exactly will the price of cotton increase; Know in one click

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button