ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Ration Card | रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! आता धान्याऐवजी खात्यात जमा होणार पैसे; त्वरित करा ‘असा’ अर्ज

Ration Card | आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असणारे दस्तऐवज म्हणजे रेशन कार्ड (Ration Card) होय. देशातील सर्व सामान्य नागरिकांना या अंतर्गत कमी दरात अन्न धान्य दिले जाते. तसेच आता राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन नियम जारी करण्यात आले आहे. तसेच राज्य शासनाने रेशन धारकांबाबत (Ration Card) मोठा निर्णय घेतला आहे. आता 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील नागरिकांना रेशन धान्य ऐवजी खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.

14 जिल्ह्यांतील रेशन कार्डधारकांना मिळणार पैसे
आता रेशन कार्डधारकांना (Ration Card Rule) रेशन वरील अन्नधान्य ऐवजी रोख रक्कम मिळणार आहे. आता त्यांचे अन्नधान्य मिळणे बंद होणार आहे. तर औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील नागरिकांना याच लाभ मिळणार आहे.

का घेण्यात आला निर्णय?
अन्नधान्याचा साठा उपलब्ध नसल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना अन्नधान्य ऐवजी खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर रेशन कार्ड धारकांच्या खात्यात 150 रुपयांची रक्कम खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 28 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आला आहे.

लाभासाठी करावा लागेल अर्ज?
रेशन कार्डवरील धान्याऐवजी खात्यात पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला विहित नमुन्यात रेशन दुकानात अर्ज करावा लागणार आहे. यासाठी कुटुंबप्रमुखाच्या नावावर अर्ज करावा लागणार आहे. या अर्जामध्ये कुटुंबप्रमुखाची माहिती बँकेचे डिटेल्स ही सर्व माहिती द्यावी लागणार आहे. तसेच कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्डची (aadhar card) कॉपी द्यावी लागणार आहे. महाडीबीटीद्वारे याचा लाभ मिळणार असल्याने आधारशी लिंक असलेल्याच बँक खात्याचे डिटेल्स द्यावे. अशाप्रकारे अर्ज केल्यानंतर तुम्हाला याचा लाभ मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Money to be deposited in the account instead of grain on the ration card; Apply immediately

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button