ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

PM Kisan | अजूनही पीएम किसानचा 11 वा हप्ता मिळाला नाहीये? जाणून घ्या कारण अन् थेट ‘या’ नंबरवर करा कॉल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मे रोजी 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 21,000 कोटी रुपये हस्तांतरित करून पीएम किसान योजनेचा (PM Kisan Nidhi Yojana) 11 वा हप्ता जारी केला.

PM Kisan | या योजनेंतर्गत प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रतिवर्षी 6000 रुपये जमा केले जातात. काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले (Farmers get paid) आहेत तर काहींना पैसे मिळत नाहीत. 11व्या हप्त्याचे पैसे अजून मिळाले नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या रेकॉर्डमध्ये त्रुटी (Record error) असू शकते किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये (Account problem) समस्या असू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

कागदपत्रांमध्ये त्रुटी
जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता मिळाला नसेल, तर तुम्ही सबमिट केलेल्या कागदपत्रात तुमच्या नावात तफावत असू शकते. तुम्हाला ही त्रुटी दूर करण्याची आवश्यकता आहे. असे देखील होऊ शकते की तुमची केवायसी स्थिती अपडेट केलेली नाही किंवा ती कालबाह्य झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकर्‍यांनी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक होते, ज्याची अंतिम तारीख सरकारने 31 जुलै 2022 पर्यंत वाढवली होती.

वाचाPM Kisan | पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 2 हजारांसाठी ‘ही’ माहिती देणं बंधनकारक, अन्यथा…

पत्ता अपडेट केला की नाही
किसान निधीसाठी अर्ज करताना तुम्ही दिलेला पत्ता आणि आधारमध्ये नमूद केलेला पत्ता वेगळा असू शकतो. तसे असल्यास, तुमच्या दस्तऐवजात तोच पत्ता अपडेट करण्याचे सुनिश्चित करा.

आधार क्रमांक तपासा
फॉर्म भरताना तुम्ही तुमचा आधार क्रमांक चुकीचा टाकला असेल. तसे असल्यास, ते पहा. जर काही चूक झाली तर तुम्हाला पीएम किसान निधीचे पैसे मिळू शकणार नाहीत.

वाचा: Crop Insurance | राज्यात 15 जुलैपासून बीड पॅटर्न लागू, वाचा काय आहे बीड पॅटर्न अन् शेतकऱ्यांना काय होणार फायदा?

फसवणुकीपासून दूर रहा
या योजनेचा उद्देश खऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा हा आहे. तर या योजनेत सहभागी होण्यास पात्र नसलेले अनेक आहेत. अनेक लोक या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात. असे लोक उशिरा का होईना तपासात येतात.

‘असे’ तपासा आणि करा एक कॉल
पीएम किसान 11 वा हप्ता खात्यात जमा झाला आहे की नाही हे तपासणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://pmkisan.gov.in/. त्यानंतर उघडणाऱ्या वेबपेजच्या उजव्या कोपर्‍यात ‘लाभार्थी स्थिती’ टॅबवर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाका. ‘डेटा मिळवा’ टॅबवर क्लिक करा. त्यानंतर लाभार्थी स्थितीचे तपशील वेबपेजवर प्रदर्शित केले जातील. याशिवाय, तुम्ही ईमेल आयडी: [email protected] आणि pmkisan-[email protected] वर मेल करून किंवा पीएम-किसान हेल्पलाइन नंबर: 011-24300606 किंवा 1800-115-526 वर कॉल करून माहिती मिळवू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button