ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Agriculture | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ‘या’ जिल्ह्यांना तब्बल 26 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या सविस्तर

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून मदत केली जाते.

Agriculture | जुलै ते ऑक्टोबर 2019 मध्ये अतिवृष्टी, (Heavy rain) गारपीट पाऊस (Hail) यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी (Helping farmers) 26.1 इतकी मदत वितरित करण्यासाठी मंगळवारी 28 जून 2012 रोजी शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आली आहे. 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान (Farmers affected by heavy rains) झालेले होते. याच नुकसानग्रस्तांना 5 हजार 380 कोटी रुपयांची मदत (नुकसानग्रस्तांना मदत) वितरीत करण्यात आली होती. मात्र काही भागातील शेतकरी अद्यापही या मदतीपासून वंचित होते. यासाठीच 23 ऑगस्ट 2021 रोजी मंत्रिमंडळ बैठक पार पडली होती. ज्या बैठकीत उर्वरित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच अनुषंगाने मंगळवारी 28 जून 2005 रोजी शासन निर्णय घेऊन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

काय आहे शासन निर्णय?
या संदर्भातील 28 जून 2012 रोजीचा महसूल आणि वन विभागाचा शासन निर्णय पाहूया. जुलै ते ऑक्टोबर 2019 मधील अतिवृष्टी पुरांमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत मे, जुलै आणि ऑगस्ट 2019 मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 26.4 कोटी एवढा निधी वितरित करण्यासाठी आणि तो निधी विभागीय आयुक्त कोकण उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

वाचाPM Kisan | पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 2 हजारांसाठी ‘ही’ माहिती देणं बंधनकारक, अन्यथा…

वाचा: Crop Insurance | महाराष्ट्रात बदलणार पीक विमा योजनेचा पॅटर्न? जाणून घ्या काय होणार बदल

कोणत्या जिल्ह्याला किती निधी?
ठाणे जिल्ह्यासाठी एकूण 23.7 कोटी, पालघर जिल्ह्यासाठी 2. 27 कोटी, रायगड जिल्ह्यासाठी 1 लाख 17 हजार रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 77 लाख 31 हजार रुपये असे एकूण ठाणे पालघर रायगड आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी 26 कोटी रुपये इतकी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button