ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञानकृषी बातम्या

Dung | काय सांगता? शेणापासून केवळ गोवऱ्याच नाहीतर बनतात ‘या’ वस्तू, तुम्हीही करू शकता ‘हे’ व्यवसाय

शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो. त्याचवेळी अनेक पशुपालक (Pastoralist) गावागावात गाई-म्हशींचे शेण निरुपयोगी म्हणून फेकून देताना दिसतात.

Dung | मात्र, आजच्या युगात शेणखतापासून (Dung) शेणखत (Manure) तयार करण्यापासून इतर अनेक गोष्टी बनवण्यासाठी शेणाचा वापर केला जात आहे. याशिवाय शेणापासून इतर अनेक प्रकारची उत्पादने बनवली जात असल्याने त्याला बाजारात मोठी मागणी आहे. शेतकरी शेणाचा वापर (Use of dung) करून बायोगॅस, अगरबत्ती, दिवे, कागद, सीएनजी प्लांट, भांडी अशा अनेक प्रकारची उत्पादने बनवू शकतात. शेतकरी आणि पशुपालकांना शेणाच्या या उपयोगांबद्दल सांगणार आहोत.

शेणापासून तयार केलेला कागद
गाई – म्हशीच्या शेणाचा वापर करून कागद तयार करता येतो. भारत सरकारही या प्रकल्पावर काम करत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पशुपालकांकडून शेण खरेदी करून त्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे.

वाचा: Crop Insurance | महाराष्ट्रात बदलणार पीक विमा योजनेचा पॅटर्न? जाणून घ्या काय होणार बदल

शेणापासून मूर्ती आणि भांडी
आजकाल शेणापासून मूर्ती बनवण्याची प्रथाही झपाट्याने वाढली आहे. चिकणमातीच्या तुलनेत शेणापासून मूर्ती बनवण्याचा खर्च कमी असतो आणि जास्त नफा मिळवता येतो. मेक इन इंडिया , क्लीन इंडिया आणि ग्रीन इंडिया अंतर्गत गायीच्या शेणापासून मूर्ती बनवण्याची मोहीमही राबविण्यात येत आहे. अशा कामात महिलांचा सक्रिय सहभाग असतो. याशिवाय भांडी बनवण्यासाठीही शेणाचा वापर केला जातो.

शेण बायोगॅस प्लांट व्यवसाय
शेणापासून बनवलेला बायोगॅस प्लांट बसवून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. प्लँट उभारण्यासाठी तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदतही मिळू शकते.

वाचा: Mahindra Scorpio | शेतकऱ्यांची आवडती महिंद्रा स्कॉर्पिओ एन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि बुकिंग चार्जेस

अगरबत्ती बनवण्यासाठी वापर
अगरबत्ती बनवण्यासाठी गाईच्या शेणाचा वापर केला जातो. अनेक कंपन्या पशुपालक शेतकऱ्यांकडून वाजवी किमतीत शेण खरेदी करतात आणि सुगंधी अगरबत्ती बनवण्यासा वापरतात.

कंपोस्टिंगमध्ये वापर
आजकाल सरकारही शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देते. शेणखताचा खत म्हणून वापर त्याच्या लागवडीमध्ये खूप महत्त्वाचा ठरतो. त्याचा वापर करून शेतकरी जीवामृत ते गांडुळ खत बनवून त्यांच्या पिकांचे उत्पादन वाढवू शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button