ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

MNREGA| या शेतकऱ्यांना मिळणार ४ लाखांचे अनुदान ! मनरेगा सिंचन योजनेतील शेतकऱ्यांची यादी जाहीर

MNREGA | शिंदे – फडणवीस सरकारने मध्यंतरी मनरेगा सिंचन योजनेअंतर्गत (Manrega Sinchan Yojana) नवीन घोषणा केली होती. यानुसार मागेल त्याला विहरीसाठी चार लाखांचे अनुदान मिळणार होते. तसेच या योजनेतील काही अटी शिथिल केल्याचे पत्रक देखील नुकतेच जाहीर केले होते. दरम्यान राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे. ( Subcidy for Well)

पात्र शेतकऱ्यांची यादी झाली जाहीर

दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी या सिंचन योजनेसाठी अर्ज केला होता. त्यांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. (List of farmers) यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर झाला आहे ? कोणाला किती अनुदान मिळाले आहे ? याबाबत सर्व माहिती देण्यात आलेली आहे. ही माहिती कशी पहायची याबाबत जाणून घेऊयात.

अशी पहा यादी

१) सर्वात आधी मनरेगाच्या nrega.nic.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
२) त्यानंतर ग्रामपंचायत वर जाऊन generate report या ऑप्शनवर क्लिक करा.
३) याठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र राज्य, वर्ष, जिल्हा, तालुका व गाव निवडावे लागेल.
४) यानंतर proceed करा.
५) याठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाचा डॅशबोर्ड दिसेल. यामध्ये तुमच्या गावात सुरू असणारी सर्व प्रकारची कामे दिसतील.
६) येथे work status वर क्लिक करा.
७) येथे Finantial year निवडा.
८) येथे कामाची लिस्ट दिसेल. यामध्ये वैयक्तिक काम निवडा
९) याठिकाणी तुम्हाला चालू आर्थिक वर्षातील वैयक्तिक कामे दिसतील. यामध्ये मनरेगा सिंचन योजनेअंतर्गत मागेल त्याला विहीर अनुदान मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची यादी दिसेल.

या शेतकऱ्यांना किती लाखांचे अनुदान मिळेल. ही माहिती सुद्धा याठिकाणी उपलब्ध होईल. महत्त्वाची बाब म्हणजे चालू आर्थिक वर्षाव्यतिरिक्त मागील वर्षातील माहिती देखील याठिकाणी तुम्ही पाहू शकता.त्यासाठी फक्त आर्थिक वर्ष बदलावे लागेल. तसेच इतर योजनांची माहिती सुद्धा तुम्ही याठिकाणी घेऊ शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: List of farmers selected for Manrega Sinchan Yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button