ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या
ट्रेंडिंग

Insurance Claim | अवकाळी पावसाने नुकसान झालंय ? चिंता नका करू ! पीक विम्यासाठी असा करा क्लेम …

Insurance Claim | देशात एकीकडे चक्रीवादळाच्या (Insurance Claim) पार्श्वभूमीवर अलर्ट देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. दरम्यान नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले, तर काय करावे ? याबाबत माहिती घेऊयात.

पीएम पीक विमा योजना

नैसर्गिक संकटे आल्यास शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर पीएम पीक विमा योजना (PM crop insurance Scheme) सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये कमी पैसे भरून शेतकरी पिकाचा विमा उतरवतात. जर नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर त्यांना क्लेम करता येतो. यामध्ये विमा कंपनी नुकसानीची भरपाई देते.

शेतकरी ठरवतात पिकाचा विमा काढावा की नाही ?

अगदी सुरुवातीच्या काळात शेतीसाठी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा उतरवणे सरकारने बंधनकारक केले होते. मात्र सध्या तरी आपल्या पिकाचा विमा (Crop insurance) काढावा की नाही हे शेतकऱ्यावर अवलंबून आहे. सध्या बरेच शेतकरी आपल्या पिकांचा विमा काढतात. दरम्यान विमा काढल्यानंतर शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई कशी मिळते ते जाणून घेऊया?

पीक विमा कसा काढावा ?

ज्या शेतकरी मित्रांकडे किसान क्रेडिट कार्ड ( Kisan Credit Card) आहे तसेच ज्यांनी इतर कोणतेही कृषी कर्ज घेतले आहे ते शेतकरी त्याच बँकेतून पिकांचा विमा काढू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना बँकेत एक फॉर्म भरावा लागतो. महत्त्वाची बाब म्हणजे बँकेकडे शेतकऱ्यांची जमीन आणि इतर कागदपत्रे असल्याने विमा सहज होतो. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलेच नाही ते कोणत्याही बँकेकडून हा विमा घेऊ शकतात.

Documents | पीक विमा काढण्यासाठी कागदपत्रे

१) आधारकार्ड
२) जमिनीशी संबंधित कागदपत्रे
३) शेतात पेरलेल्या पिकाचा तपशील
४) बँकेतील मतदार कार्ड

Eligiblity | पात्रता

जर शेतकऱ्यांच्या ३३ टक्के शेतीचे नुकसान झाले असेल, तर शेतकऱ्यांना पिक विम्यासाठी अर्ज करता येतो. पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून शेतकरी पिकाच्या नुकसानीची माहिती देऊन क्लेम करू शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Details about how to claim for crop insurance

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button