ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Bank Holidays | बँकेने केले मे महिन्याचे सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर .. तब्बल इतक्या दिवस बँकेला सुट्टी

मे महिन्यातील काय आहे सुट्टी वेळापत्रक –

आर्थिक वर्ष 2023-24 या एप्रिल पासून सुरू झालेला असून चार दिवसात समाप्त होणार आहे. अर्थातच मे चा महिना सुरू होईल . तर भारतीय रिझर्व्ह बँकेने मे महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात बँकेचे व्यवहार महत्त्वाचे असतात. सर्वत्र गोष्टी ऑनलाइन रित्या चालू असून सुद्धा बँकेचे काम स्वतः जाऊन करावे लागतात. बँकेला सुट्टी असेल तर अनेक वेळा ग्राहकांची महत्त्वाची कामे रखडतात. यामुळे आरबीआय बँक ने सुट्टीची यादी जाहीर केली आहे. तुम्हालाही मे महिन्यात काही महत्त्वाची कामं करायची असतील तर आधी बँकांची हॉलिडे लिस्ट अवश्य पाहा.

नक्की किती दिवस बँकेला सुट्टी ?

मे महिन्यामध्ये बारा दिवसांची सुट्टी असेल असे बँकेने जाहीर केले आहे . मे 2023 मध्ये बँकांना भरपूर सुट्ट्या आहेत. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. मे महिन्यात महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा, महाराणा प्रताप जयंती असे अनेक महत्त्वाचे दिवस आहेत. त्यामुळे विविध राज्यात अनेक दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. बँक सुट्टीची यादी राज्यानुसार बदलते. आपण आज राज्यांनुसार मे महिन्‍यातील सुट्ट्‍यांची संपूर्ण यादी पाहणार आहोत.

कोणत्या दिवशी आहेत बँका बंद ?

सुरुवातच महाराष्ट्र दिनाने होते व त्यामुळे 1 मे 2023- महाराष्ट्र दिन/मे दिनानिमित्त बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोची, कोलकाता, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा आणि त्रिवेंद्रम येथे बँका बंद राहतील. -5 मे 2023- बुद्ध पौर्णिमेनिमित्त आगरतळा, ऐझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, जम्मू, कानपूर, कोलकाता, मुंबई, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील. -7 मे 2023- रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील. -9 मे 2023- रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त कोलकातामध्ये बँका बंद राहतील. -13 मे 2023- दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील. -14 मे 2023- रविवारमुळे बँका बंद राहतील. -16 मे 2023- सिक्कीममध्ये राज्य दिनानिमित्त बँका बंद राहतील. -21 मे 2023- रविवारमुळे बँकांना सुट्टी असेल. -22 मे 2023- महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शिमल्यात बँका बंद राहतील. -24 मे 2023- काझी नजरुल इस्लाम जयंतीनिमित्त त्रिपुरातील बँका बंद राहतील. -27 मे 2023- चौथ्या शनिवारमुळे बँका बंद राहतील. -28 मे 2023- रविवारमुळे संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल. तर अशाप्रकारे सुट्ट्यांचा वेळापत्रक बँकेने जाहीर केला आहे. तुमची महत्त्वाची कामे यामुळे रखडली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button