ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

आता १५ दिवसांत शेतजमीन मोजून मिळणार ; बांध कोरकोरीला आळा घालण्यासाठी भूमिअभिलेख विभागाची नवीन शक्कल !

शेतजमिनीच्या शेत्रावरून अनेकदा शेतकऱ्यांमध्ये वाद होतात. दरम्यान राज्य सरकारने ( State Government) यावर आता भारी उपाययोजना केली आहे. यापुढे शेतजमीन मोजणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होणार आहे. यासाठी सॅटेलाईटचा वापर करण्यात येणार आहे. भूमिअभिलेख कार्यालयात रखडलेल्या सर्व जमीन मोजण्या १ जुलैनंतर सॅटेलाईटच्या ( Satellite) माध्यमातून होणार आहेत. याबाबतची माहिती राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिली आहे. ( Radhakrishna Vikhepatil)

जमीन मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान

जमिनीची मोजणी केल्यानंतर झालेल्या खुणाखुणा शेतकऱ्यांकडून काढून टाकल्या जाणे, वारंवार जमिनीची मोजणी करावी लागणे तसेच मोजणीशी निगडित वादाचे प्रकार वाढणे या गोष्टी थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भूमिअभिलेख विभाग म्हणजेच मोजणी विभागाने हा आधुनिक उपाय शोधला आहे.

सॅटेलाईटच्या माध्यमातून मतमोजणी केल्याने होणारे फायदे

१) मोजणीच्या वेळेत निम्म्याने बचत होणार.
२) शेतकऱ्यांना आता अक्षांश व रेखांशासह मोजणी नकाशे मिळणार
३) अचूक मोजणी होणार
४) मोजणीच्या खुणा मिटवल्या जाण्याची समस्या उरणार नाही
५) मोजणीसाठी शेतकऱ्यांची होणारी त्रेधातिरपीट थांबणार.
६) मोजणीच्या खर्चात बचत होणार
७) मोजणीमुळे होणारे वाद टळणार

सध्या सर्वच क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. यातच आता जमीन मोजणीच्या प्रक्रियेत सुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव दिसून येणार. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. सॅटेलाइट मोजणीमुळे शेत जमीन मोजणी विना वादाची पार पडणार आहे.

१५ दिवसांत मोजणी पार पडणार

महत्त्वाची बाब म्हणणे यापुढे जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज दिल्यानंतर किमान १५ दिवसांत मोजणी पार पडणार आहे. नवीन तंञज्ञानामुळे अतिशय जलद पद्धतीने जमीन मोजणी पार पडणार आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या बांध कोराकोरी व वादविवादाला या मोजणीतून पुर्णविराम मिळणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे.

Web Title: Agriuculture Land measurement thorough Satellite under 15 days

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button