ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

Agricultural Technology | धडाका! शेतकऱ्यांना होणार फायदा…हवामानाचा अचूक अंदाज आणि शेती वाचणारा इस्रोचा नवा उपग्रह येतोय!

Agricultural Technology | चंद्र आणि सूर्यासोबतच आता हवामानाचा अभ्यास करण्यासाठीही भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) लवकरच एक मोहीम सुरू करणार आहे. हवामान अंदाज आणि आपत्ती चेतावणी देण्यासाठी इस्रोने एक नवीन उपग्रह विकसित केला आहे. (Agricultural Technology) हा उपग्रह फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

INSAT-3DS या नावाच्या या उपग्रहात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवामानाच्या बदलांचा अचूक अंदाज लावण्यास सक्षम असेल. याशिवाय, हा उपग्रह समुद्राच्या पृष्ठभागावरील हालचालींचे देखील निरीक्षण करेल. यामुळे सागरी वादळे आणि इतर आपत्तींबाबत वेळीच चेतावणी देणे शक्य होईल.

INSAT-3DS हे भारतीय हवामान विभागाला मोठी मदत करेल. या उपग्रहाच्या मदतीने हवामान विभाग अधिक अचूक हवामान अंदाज लावू शकेल. यामुळे शेतकऱ्यांना, उद्योगांना आणि इतर सर्व घटकांना हवामानाच्या बदलांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळेल.

वाचा | International Space Station | बापरे ! आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक कोसळणार; पृथ्वीला धोका? जाणून घ्या सविस्तर …

INSAT-3DS हा हवामान वेधशाळा उपग्रहांच्या मालिकेचा एक भाग आहे. या मालिकेत आणखी 3 उपग्रह आहेत. INSAT-3DS हा या मालिकेतील सर्वात अत्याधुनिक उपग्रह आहे.

इस्रोच्या या उपग्रह प्रक्षेपणामुळे भारतातील हवामानशास्त्रीय संशोधनाला चालना मिळेल. या उपग्रहामुळे देशात हवामान सेवांचे गुणवत्तापूर्णीकरण होण्यास मदत होईल.

Web Title | Agricultural Technology Bang! Farmers will benefit… ISRO’s new satellite for accurate weather forecasting and reading agriculture is coming!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button