ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

New Varieties Of Cotton | कम खर्च, जास्त उत्पादन, बंपर कमाई! नांदेडच्या नव्या कापूस वाणांनी शेतकऱ्यांचं आयुष्य बदललं!

New Varieties Of Cotton | Low Cost, High Production, Bumper Earnings! Nanded's new cotton varieties have changed the lives of farmers!

New Varieties Of Cotton | वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या नांदेड कापूस संशोधन केंद्राने आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती घडवणारे तीन नवीन बीटी कापूस वाण विकसित केले आहेत. या(New Varieties Of Cotton) वाणींच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या अनेक चिंता दूर होणार असून, उत्पादन वाढीसह बियाणे खर्चाचा डोंगरही उतरणार आहे.

या नवीन वाणींची वैशिष्ट्ये खास आहेत. ही सर्व बीटी वाण सरळ स्वरूपातील असून, शेतकऱ्यांना दरवर्षी बियाणे खरेदी करण्याची गरज नाही. मागील हंगामातील कापसाच्या बोंडांमधून सरकी वेगळी करून पुढील वर्षासाठी बियाणे म्हणून वापरता येणे हा या वाणाचा सर्वात मोठा फायदा आहे. यामुळे बियाणे खर्चाची बचत होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

या वाणांची उत्पादकताही लक्षणीय आहे. हेक्टरी 16 ते 18 क्विंटलपर्यंत कापूस मिळणे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे वाण विशेषतः कोरडवाहू क्षेत्रासाठी उत्तम असून, तेथील हवामान आणि जमिनीच्या गुणधर्मांना अनुकूल आहेत. या वाणांवर रस शोषणारी किडींचाही कमी प्रभाव पडतो, त्यामुळे किटकनाशकांचा वापर कमी होऊन उत्पादनाची गुणवत्ताही वाढेल.

वाचा : Drought | दुष्काळ नाही म्हणजे काय? मग शेतकऱ्यांना धोका का?

“एन.एच.1901”, “एन.एच.1902” आणि “एन.एच.1904” अशी या नवीन वाणांची नाव आहे. केंद्रीय वाण प्रसारण समितीने या वाणांची मध्य भारत आणि महाराष्ट्राच्या काही भागात लागवडीची शिफारस केली आहे. लवकरच हे वाण बाजारात उपलब्ध होणार असून, नांदेड, परभणी, जालना, बीड या कापूस उत्पादक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी ते वरदान ठरतील.

नांदेड कापूस संशोधन केंद्र हे केवळ वाण निर्माणावरच थांबले नाही. मोठ्या आकाराच्या सरळ आणि संकरित वाणांची निर्मिती, सधन लागवडीसाठी योग्य वाण तयार करणे, उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञान विकसित करणे आणि गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी उपाय शोधणे यासारखी विविध क्षेत्रात संशोधन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि उत्पन्नाला चालना देणारे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत.

Web Title : New Varieties Of Cotton | Low Cost, High Production, Bumper Earnings! Nanded’s new cotton varieties have changed the lives of farmers!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button