ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Cotton Planting | ‘या’ जिल्ह्यात राबवला जातोय ‘एक गाव एक वाण’ उपक्रम, जाणून घ्या काय आहे यामागच उद्दिष्ट?

भारत हा कृषीप्रधान देश आहे. तसेच, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा शेती (Agriculture) असून कापूस हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे नगदी पिक (Cash peak) आहे.

Cotton Planting | राज्यात सर्वाधिक कापूस (Cotton farming) पिकवणारा जिल्हा म्हणून नव्याने नगर जिल्ह्याने आपली ओळख निर्माण करू लागला आहे. कापूस शेती (Cotton farming) ही सोपी नसून याच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

एक गाव एक वाण
नगर जिल्ह्यात कृषी विभागाने 61 गावांमधील सर्व शेतकऱ्यांना ‘एक गाव एक वाण’ या उपक्रमाबाबत माहिती पटवून दिली आहे. या उपक्रमाअंतर्गत एकाचवेळी 61 गावातील शेतकऱ्यांनी 5 हजार 665 हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली असून हा उपक्रम यशस्वी ठरला आहे. तसेच, या उपक्रमामुळे एकाच वेळी नगर जिल्ह्यातून कापूस पिकाचे उत्पादन काढणीसाठी येणार आहे.

वाचाPearl Millet Cultivation | खरिपातील बाजरी भरघोस उत्पादनासाठी फायदेशीर, जाणून घ्या लागवडीचे तंत्रज्ञान…

उपक्रमाचे उद्दिष्ट
दरम्यान, एकाचवेळी नगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे पीक कडणीसाठी निघावे आणि यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी चांगला दर मिळावा हे या उपक्रम राबवण्यामागचे उद्दिष्ट आहे. तसेच, कापसाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे त्याचे दरही वाढले आहेत.

वाचा: Lady Finger Farming | शेतकरी मित्रांनो ‘अशा’प्रकारे करा भेंडी लागवड अन् मिळवा भरघोस उत्पादन

नगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा, पाथर्डी या तालुक्यांमध्ये कापसाचे क्षेत्र अधिक असून राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, कोपरगाव इत्यादी उर्वरित तालुक्यांमध्ये कापसाची लागवड मध्यम स्वरूपात केली जात आहे. त्यामुळे कापूस पिकाच्या उत्पादन काढणीचा कालावधी वेगवेगळा होत असून ‘एक गाव एक वाण’ या उपक्रमातून एकाचवेळी हा लागवड करण्यात आली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button