ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Cow Tagging | शेतकऱ्यांना ५ रुपये दिलासा! थेट दूध अनुदान योजनेला ‘टॅगिंग’ अडचण, नियमांवरून खासगी डेअरींचा गोंधळ!

Cow Tagging | राज्य सरकारने जाहीर केलेल्या थेट दूध अनुदान योजनेला खासगी डेअरी प्रकल्पांचा विरोध होत आहे. या योजनेसाठी दुधाळ गायीचे टॅगिंग बंधनकारक करण्यात आले आहे. (Cow Tagging) यामुळे एजंटांकडून दूध गोळा करणाऱ्या खासगी डेअरी प्रकल्पांना अडचणी येत आहेत.

दुग्धव्यवसाय विकास खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गाय दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत देण्यात येणार आहे. यासाठी दुधाळ गायीचे टॅगिंग केलेले असणे आवश्यक आहे. दुधाळ गायीचे टॅगिंग क्रमांक, पशुपालक शेतकऱ्याचा आधार क्रमांक व बॅंक खाते क्रमांक एकमेकांशी संलग्न करण्यात आले आहे.

एजंटांकडून दूध गोळा करणाऱ्या खासगी डेअरी प्रकल्पांना या योजनेसाठी शेतकऱ्यांची माहिती देणे कठीण आहे. कारण, या प्रकल्पांमध्ये २ ते ३ एजंटांची साखळी असते. त्यामुळे शेतकऱ्यांची माहिती अचूकपणे गोळा करणे शक्य होत नाही.

वाचा | Air Tagging | पशुधन ला एअर टॅगिंग नेमक कशासाठी? काय आहे एअर टॅगिंग ; जाणून घ्या सविस्तर …

यामुळे काही खासगी डेअरी प्रकल्पांनी या योजनेला चुकीची असल्याची आवई उठवली आहे. परंतु, दुग्धव्यवसाय विकास खात्याने स्पष्ट केले आहे की, नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल.

या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगला भाव मिळेल.

Web Title | Cow Tagging | Rs 5 relief to farmers! Direct milk subsidy scheme ‘tagging’ problem, confusion of private dairies due to rules!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button