ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Milk Subsidy | गाय दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान पण एअर टॅगिंग अटमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम; पहा सविस्तर..

Milk Subsidy | Rs 5 per liter subsidy on cow milk but confusion among farmers due to air tagging condition; See in detail..

Milk Subsidy | महाराष्ट्र शासनाच्या दुग्ध आणि पशुसंवर्धन खात्याने यंदा जानेवारी आणि फेब्रुवारीमधील उत्पादित गाय दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान स्वरूपात देण्याची घोषणा केली आहे. थेट दूध उत्पादकाच्या बँक खात्यात अनुदान रक्कम जमा केली जाणार आहे. (Milk Subsidy) यासाठी केवायसी आधारित नियमित कागदपत्रांसह पशुधनाची इत्यंभूत माहिती देणारे एअर टॅगिंगची (कानातील बिल्ला) अट बंधनकारक करण्यात आली आहे. याचाच अर्थ, एअर टॅगिंग नसल्यास संबंधित दूध उत्पादकाला अनुदानाचा लाभ मिळणार नाही.

पशुसंवर्धन विभागाचे वैद्यकीय अधिकारी व दूध संस्थांच्या समन्वयातून पशुधनाची एअर टॅगिंग मोहीम सुरू झाली आहे. यासाठी शासकीय अधिकाऱ्यांतर्फे गोठ्यातील दुधाळ जनावरांचे एअर टॅगिंग करून त्याची नोंद भारत पशुधन पोर्टल अॅपवर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील पशुपालक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुधनाच्या एअर टॅगिंगची घातलेली अट अनिवार्यच करायची होती तर अनुदान योजना जाहीर करण्यापूर्वी पशुसंवर्धन विभागामार्फत हे एअर टॅगिंगचे काम पूर्ण करणे गरजेचे होते. तसे न करता शासनाने खात्यातील मनुष्यबळाच्या कमतरतेची ढाल पुढे करून वरातीमागून घोडे दामटण्याचा केलेला प्रयत्न या अनुदान योजनेत खोडा घालणारा ठरतोय, अशी पशुपालक शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

प्रक्रिया परिपूर्तीसाठी मोठा कालावधी लागू शकतो. यामुळे जाहीर अनुदान रक्कम उपलब्ध होण्याची शेतकऱ्यांना खात्री पटलेली दिसत नाही. दूध संकलन करणाऱ्या दूध संस्थेने सर्व दूध उत्पादकांना अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याबाबत सूचना द्याव्यात. दूध उत्पादकाचे नाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक, पशुधन संख्या यासह नोंद केलेल्या एअर टॅग -12 अंकी- क्रमांक आदी माहिती भरणे भरजेचे आहे.

वाचा : Godam Yojna | गाव तिथे गोदाम योजना; शेतकऱ्यांना मिळणार साठवणुकीची सोय, जाणून घ्या योजनेविषयी सविस्तर

शेतकऱ्यांच्या नाराजीचे कारणे

  • अनुदान योजना जाहीर करण्यापूर्वी पशुसंवर्धन विभागाने एअर टॅगिंगचे काम पूर्ण केले पाहिजे होते.
  • एअर टॅगिंगसाठी आवश्यक मनुष्यबळ पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध नाही.
  • प्रक्रिया परिपूर्तीसाठी मोठा कालावधी लागू शकतो.
  • अनुदान रक्कम उपलब्ध होण्याची शेतकऱ्यांना खात्री पटलेली नाही.

शासनाने काय करावे?

  • एअर टॅगिंगसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे.
  • प्रक्रिया परिपूर्तीसाठी पुरेसा वेळ देणे.
  • अनुदान रक्कम त्वरित उपलब्ध करून देणे.

Web Title | Milk Subsidy | Rs 5 per liter subsidy on cow milk but confusion among farmers due to air tagging condition; See in detail..

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button