ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Milk Subsidy | आनंदाची बातमी ! महाराष्ट्र सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपयांचे अनुदान

Milk Subsidy | Good news! Maharashtra Govt to give subsidy of Rs 5 per liter to milk producing farmers

Milk Subsidy | महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे ( Milk Subsidy) दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या निर्णयानुसार, राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायींच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर 5 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ही योजना 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी लागू राहणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी आणि पशुधनाच्या आधारकार्डशी (Ear Tagging) लिंक असणे आवश्यक आहे. याची पडताळणी करणं आवश्यक राहील.

वाचा : Rent Farm Land | शेती महामंडळाकडून शेतजमीन भाड्याने कशी घ्यावी?

या निर्णयाचे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

खासगी संघांना अनुदान द्यावे अशी मागणी

राज्यातील 72 टक्के दूध खासगी संस्थांना दिले जाते. सरकारनं दिलेलं अनुदान फक्त सहकाराला आहे. त्यामुळं बहुतांश दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार आहेत. किसान सभानं सरकारनं सर्वांना अनुदान द्यावं अशी मागणी केली होती.

या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं या योजनेत बदल करून खासगी संघांना देखील अनुदान देण्याचा निर्णय घेतला पाहिजे अशी मागणी होऊ शकते.

Web Title | Milk Subsidy | Good news! Maharashtra Govt to give subsidy of Rs 5 per liter to milk producing farmers

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button