ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

App | ‘ई-पीक पाहणी’ ऍपमुळे पिकाची नोंदणी होणारं चुटकीसरशी, जाणून घ्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया

“माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा" या घोषवाक्याचा आधारे शासकीय पातळीवर प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून (Farmer) 'ई-पीक’ पाहणी मोहिमेची (E Crop Inspection Campaign) सुरुवात झाली आहे.

App | याअगोदर, शेतकऱ्यांच्या पीक (Crop) पेऱ्याची नोंद (Note) ही तलाठ्यांमार्फत केली जात होती. त्यामुळे बहुतांश वेळा कोणत्याही नैसर्गिक (Natural Disaster) किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे (Man-made disaster) प्रत्यक्ष गट क्रमांकात न जाता शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा पीकपेरा नोंदविला जात होता.

ई-पीक पाहणी ऍप सुरू करण्यामागील उद्देश
मात्र, आता ई-पीक पाहणीच्या माध्यमातून शेतीमध्ये झालेली नुकसानभरपाईची अचूक नोंद करता येणार आहे. यासाठी 2021-22 या चालू वर्षांपासून 7/12 वरील पिकांची नोंदणी ही “ई-पीक पाहणी” या मोबाईल ऍपच्या माध्यमातूनच होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील पिकांची नोंदणी ‘ई-पीक पाहणी’ या मोबाईल ऍपद्वारे करावी लागणार आहे. तलाठ्याकडील कामांचा वाढलेला ताण आणि पिकांची अचूक नोंदणी करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी ‘ई-पीक पाहणी’ ऍप सुरू करण्यामागचा उद्देश आहे.

वाचा: Poultry Farming | कुक्कुटपालन अनुदानासाठी अर्ज सुरू, लाभार्थ्यांना मिळणार ‘इतके’ अनुदान

शेतकऱ्यांच्या नुकसानीची परतफेड होत नव्हती
जमीन व महसूलीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावातील तलाठ्याकडे ‘गाव नमुने’ असतात. या नमुन्यामधील माहितीमुळे शेतकऱ्यांची जमीन, उत्पादन, पीक यांची माहिती असते. अशातच, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. मात्र, तलाठी हा 2-3 गावांचे काम पाहत असल्यामुळे पीक पाहणी अचूक नोंदविला जात नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीची परतफेड हवी तशी होत नव्हती.

वाचा: Goat rearing | शेळीपालनाचा विचार करताय? तर ‘या’ जातींच्या शेळ्यांची करा निवड अन् मिळवा नफा

ई-पीक पाहणी ऍपवर नोंदणी कशी करावी?
सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरुन ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करून घ्यावे. संबंधित ऍप ओपन करून आपला दहा अंकी मोबाईल नंबर टाकून त्या नंबरवर येणारा ओटीपी टाकावा. यानंतर, ई-पीक पाहणी ऍप ओपन होईल. या ॲपच्या प्रोफाइल मध्ये स्वतःचा फोटो अपलोड करून ई-पीक पाहणी ॲपमध्ये अपलोड पर्याय निवडून माहिती अपलोड करावी. ही सर्व प्रक्रिया करताना फोनमधील जीपीएस (GPS) चालू करावे.

ऍप डाऊनलोड कसे कराल?
दरम्यान, ई-पीक पाहणी ॲपच्या अधिक माहितीसाठी तुम्ही गावातील तलाठी किंवा कृषी सहायकाशी संपर्क साधू शकता. ई-पीक पाहणी ऍप डाऊनलोड करण्यासाठी या https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek लिंकवर क्लिक करून तुम्ही ऍप डाऊनलोड करू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button