ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Cyclone Mocha | हवामान विभागाचा इशारा ! देशात येणार यावर्षीचे पहिले चक्रीवादळ ; उरलेत फक्त काही तास…

Cyclone Mocha| आपल्या आजूबाजूला अनेक नैसर्गिक घटना घडत असतात. हवामानात होणारा बदल ही त्यातलीच एक गोष्ट आहे. हवामान खात्याकडून नेहमी हवामान, पर्जन्यमान आणि इतर गोष्टींचा अंदाज वर्तवला जातो. दरम्यान हवामान विभागाने (IMD) नुकताच मोठा इशारा दिला आहे. पुढच्या काही तासांत देशात चक्रीवादळ येणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

देशात चक्रीवादळ येणार

येत्या दोन दिवसांत दक्षिण-पूर्व बंगालच्या खाडीजवळ असणाऱ्या भागात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे पुढच्या काही तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ २०२३ या वर्षातील पहिले वहिले चक्रीवादळ असणार आहे. यामुळे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. (Fisrt cyclone of 2023)

हवामान विभागाने व्यक्त केला हा अंदाज

यूरोपच्या सेंटर फॉर मेडियम- रेंज वेदर फोरकास्ट्स (ECMWF) आणि अमेरिकेच्या ग्लोबल फोरकास्ट सिस्टीम (GFS) यांनी याबाबत दावा केला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळासारखे वातावरण निर्माण होत आहे असा अंदाज या विभागांनी व्यक्त केलाय. यानंतर भारतीय हवामान विभागाने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

Cyclone Mocha | चक्रीवादळाला मोचा असे नाव दिले

या चक्रीवादळाला Cyclone Mocha असे नाव देण्यात आले आहे. मोचा या बंदराच्या नावावरून या चक्रीवादळाचे नाव ठरविण्यात आले आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा मध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Mocha Cyclone in Odisha)

याठिकाणी वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता

सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या ठिकाणी पाऊसाची हजेरी लागेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि दक्षिण भारताचा बहुतांश किनारपट्टी भाग येथे देखील पाऊस पडेल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे याभागात सुद्धा कमी जास्त प्रमाणात वादळाचा तडाखा बसू शकतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: IMD declared cyclone alert in India

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button