ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

Cotton Bollworm | यंदा कपाशीचं उत्पादन जोरदार! केंद्रीय कापूस संस्था ‘हा’ भन्नाट उपक्रम राबवून बोंडअळीचा करणार नायनाट

खरीप हंगामात प्रामुख्याने घेतल्या जाणाऱ्या पिकात कापसाचा समावेश होतो. कापसाला दर (Cotton) देखील चांगला मिळतोय.

Cotton Bollworm | याचमुळे शेतकरी शेतीत (Agriculture) मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करतील हे निश्चितच आहे. मात्र पीक बहरायला लागले की, बोंडअळीचा धोका हा असतोच. आता यावर तोडगा काढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून बोंडअळी (Bondworm) रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावर्षी कापसाच्या उत्पादनात वाढ होईल असे चित्र निर्माण झाले आहे. कारण केंद्र सरकारने कापूस किड व्यवस्थापन (Cotton Pest Management) या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात.

बोंडअळीमुळे कपाशी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट
खरंतर कपाशी उत्पादन घेताना येणारा एक मोठा अडथळा म्हणजे बोंडअळी. कारण एकदा का कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला की, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. बोंडअळी संपूर्ण कपाशी क्षेत्रात पसरून कपाशीचा नायनाट करते. याच कारणामुळे अनेक शेतकरी कपाशी लागवडीकडे पाठ फिरवून इतर पिकांना प्राधान्य देतात. मात्र यामुळे कापसाचा भाव नेहमीच तेजीत राहतो. याच कपाशी बोंड अळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय कापूस संस्थेद्वारे एक उपक्रम राबवण्यात करण्यात येत आहे. हा उपक्रम यशस्वी ठरला तर यंदाच्या कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.

वाचा: E-Shram Card | ई-श्रम कार्ड योजनेसाठी 28 कोटी कामगारांची नोंदणी, तब्बल ‘इतक्या’ लाखांचा फायदा

बोंडअळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता प्रकल्प येतोय राबविण्यात?
कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात येण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधम संस्थेच्या माध्यमातून आयआरएम म्हणजेच इनसेक्ट रजीस्टंन्स मॅनेजमेंट हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. या प्रोजेक्टमध्ये 30 टक्के बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यात संस्थेला यश देखील मिळाले आहे.

वाचा: SBI | बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात ‘हा’ मोठा बदल, जाणून घ्या नवा बदल

कोणत्या जिल्ह्यात होणार अंमलबजावणी?
चंद्रपूर, वर्धा, अमरावती, नागपूर, यवतमाळ, नांदेड, परभणी, जालना, अकोला या जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पांची अंमलजावणी होणार आहे. खरंतर राज्यात जवळपास 40 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर सध्या वातावरणात देखील अनुकूलता असल्यामुळे कापूस उत्पादनात देखील वाढ झाली आहे. मात्र उत्पादन वाढीस लागल्यावर बोंड अळीचा धोका कायमच असतो. हाच धोका लक्षात घेता केंद्रीय कापूस संस्थेने हा नवा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Cotton production is strong this year! Central cotton organization will destroy the bollworm by implementing this wonderful initiative

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button