ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्याकृषी सल्ला

Neem Insecticide | कमी खर्चात कडुलिंबापासून बनवा कीटकनाशक-खत, उत्पादन वाढून मिळेल बक्कळ नफा, जाणून घ्या प्रक्रिया

आजकाल शेती कारण तितकं सोपं राहिलेलं नाही. कारण कोणताही पीक (Crop) घ्यायचं म्हटल की त्या पिकावर पडणारा रोग हा शेतकऱ्यांची चिंता वाढवतो.

Neem Insecticide | कारण शेतकऱ्यांना या रोगाच्या कीटकनाशकांसाठी (Pesticides) आता अधिकचे पैसे मोजावे लागत आहे. तसेच शेतात रासायनिक कीटकनाशके (Chemical pesticides) आणि खतांच्या वाढत्या वापरामुळे शेतजमिनीच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी शेतात (Agriculture) जास्तीत जास्त सेंद्रिय कीटकनाशकांचा (Organic Pesticides) वापर करण्यासाठी सरकार आपल्या स्तरावर शेतकऱ्यांना सतत प्रोत्साहन देते.

पिकांवर निंबोळी कीटकनाशकाचा करा वापर
शेतात जास्तीत जास्त सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करण्यासाठी सरकार आपल्या स्तरावर शेतकऱ्यांना सतत प्रोत्साहन देते. कृषी तज्ज्ञ शेतकऱ्यांना कडुलिंबाची पाने, कडुलिंब पेंड आणि निंबोळी यांचा कीटकनाशके म्हणून वापर करून शेतात वापरण्याचा सल्ला देतात. असे केल्याने पिकातील सर्व प्रकारच्या शत्रू कीटकांचा नायनाट होतो आणि पिकाला कोणत्याही प्रकारचे रोग जाणवत नाहीत. यासोबतच पिकांच्या उत्पादनात (crop production) अनेक पटींनी वाढ होते. याशिवाय पिकांचा खर्चही अनेक पटींनी कमी होईल.

वाचा: DPR | आता शेतकऱ्यांना थेट पाहता येणार कांदा चाळीसह ‘या’ प्रकल्पांचा डीपीआर, जाणून घ्या डीपीआर आणि प्रक्रिया

‘असे’ बनवा कडुलिंबाचे कीटकनाशक
सर्व प्रथम 10 लिटर पाणी घरी घ्या. यामध्ये पाच किलो कडुनिंब हिरवी किंवा कोरडी पाने आणि बारीक चिरलेली कडुनिंब निंबोळी, दहा किलो ताक आणि दोन किलो गोमूत्र, एक किलो लसूण एकत्र मिसळून घ्यावे. नीट मिक्स करून एका मोठ्या भांड्यात ठेवा. रोसामा हे द्रावण काड्यांमध्ये मिसळत रहा. रंग दुधाळ झाल्यावर या द्रावणात 200 मिलीग्राम साबण आणि 80 मिलीग्राम टीपॉल घाला. आपल्या गरजेनुसार या पिकांवर फवारणी करा.

वाचा: Grafting Technology | अबब..! चक्क एका झाडाला 40 फळं? विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो अन् जाणून घ्या ‘या’ तंत्रज्ञानाबद्दल…

निंबोळी खताचा करा वापर
शेतात रासायनिक खतांऐवजी कडुलिंबाच्या पानांचे खत देखील वापरले जाऊ शकते. कडुनिंबाची पाने आणि निंबोळी खड्ड्यात टाकून चांगले कंपोस्ट खत तयार करता येते. त्याचा शेतात वापर केल्यास शुद्ध पीक मिळेलच, तसेच सर्व रोगांपासूनही आपला बचाव होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Make insecticide-fertilizer from neem at low cost, increase production and get huge profit, know the process

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button