ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Organic Pesticides | शेतीचा खर्च कमी करा व बनवा घरीच कीटकनाशके, मातीचा दर्जाही सुधारेल…

Organic Pesticides | Reduce the cost of farming and make pesticides at home, soil quality will also improve.

Organic Pesticides | जमिनीचा दर्जा अधिक प्रमाणात रासायनिक कीटक नाशक फवारणीमुळे कमी होतो. कीटक नाशकांना कायमचे हटविण्यासाठी शेतकरी (farmers) महागडी रासायनिक वापरतात खरं पण याचा परिणाम जास्त जमिनीवर व मातीवर होत असतो.

कीटकनाशक फवारणीमुळे जमिनीच्या आतील सूक्ष्मजीव नष्ट होतात. व उत्पादन कमी निघते. हे सर्व परिणाम टाळण्यासाठी सेंद्रिय किडकनाशके उत्तम आहे. घरच्या घरी तुम्ही मातीचा दर्जा वाढवून कीटक नाशक घरीच बनवू शकता.

वाचा – शेतकरी मित्रांनो, ही नोंदणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करा; अन्यथा होईल नुकसान, राहिला फक्त 1 दिवस…

घरच्या घरी बनवा सेंद्रिय किटकनाशक –

१) कडुलिंबाच्या पानांपासून असे तयार करा –

एक बादली भरून कडुलिंबाची पाने घ्या. 4 दिवस पाणी घालून तसेच सोडा. 5 व्या दिवशी पाणी ढवळून फवारणी करा.

२) कडुलिंबाच्या निंबोळ्यांपासून कीटकनाशक –

1 किलो निंबोळ्या वाळवून त्याची पूड तयार करा. ही पूड 20 लिटर पाण्यात मिसळा, 10-12 तास पाण्यात भिजवा. पुढे त्या पाण्यात 20 ग्रॅम कपड्यांच्या साबणाचे द्रावण टाका. व फवारणी करा.

वाचा –“या” शेतकऱ्याने कडीपत्ता शेतीतून तब्बल 4 लाख रुपयांची केली कमाई, पहा कडीपत्ता लागवड…

) मिरची-लसूण पासून कीटकनाशक असे बनवा –

3 किलो हिरव्या मिरचीचे देठ काढून घ्या. 10 लिटर पाण्यात घालून रात्रभर झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्धा किलो लसूण घ्या व 250 मी.ली. केरोसीन तेलात टाका आणि तो रात्रभर ठेवा. उद्या सकाळी 1 लिटर पाण्यात 75 ग्रॅम कपड्याच्या साबणाचे पाणी टाका. आणि 3-4 तास सोडा. पाणी घालून एकूण 80 लीटर द्रावण तयार होऊ शकते. व फवारणी करा.

४ ) गोमूत्रापासून कीटकनाशक असे बनवा

5 किलो ताजे शेण + ५० लिटर गोमूत्र + ५ लिटर पाणी घ्या द्रावण बनवा मातीच्या भांड्यात टाकून बंद करून घ्या. हे 4 दिवस ठेवा. यामध्ये 100 ग्रॅम चुना 80 लिटर द्रावण पिकांवर फवारा.

हे ही वाचा –

पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, फायदा काय? पहा सविस्तर..

या आठवड्यात सोयाबीन पोहचला “या” दरावर, सरकारने हरभऱ्याचा देखील ठरवला हमीभाव..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button