ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Health Tips | चवी व्यतिरिक्त जीभेचा रंग सांगतो हृदयविकाराची लक्षणे, जाणून घ्या सविस्तर…

मानवाच्या पाच ज्ञानींद्रांपैकी एक असलेले ज्ञानींद्र म्हणजे जीभ. जीभ म्हटल की आपल्याला लगेच तिच प्रमुख काम आठवत, ते म्हणजे चव.

Health Tips | जीभ ही आपल्याला पदार्थांची चव सांगत असते. मग पदार्थ गोड आहे का कडू हे जीभच ठरवत असते. पण तुम्हाला माहीत आहे का? पदार्थाच्या चवी वितिरीक्त आपली जीभ आपण निरोगी आहोत का हे सांगत असते.
आपल्या आरोग्याचं रहस्य देखील जीभ आपल्याला सांगत असते. जिभेच्या बदललेल्या रंगावरून (Tongue changing colours) आपण रोगी आहोत का निरोगी हे ठरवायचं असतं.

जीभेचा रंग का महत्वाचा
प्रत्येकाच्या जीभेचा रंग आणि पोत हा वेगवेगळा असतो. पण अचानक बदललेल्या रंगावरून आपल्यात कोणत्या न कोणत्या रोगांची लक्षणे असतात. पण काही वेळेस अन्न आणि औषध यांमुळे ही जीभेचा रंग बदलत असतो. (उदा – जांभूळ खाल्ले की जीभ ही निळ्या रंगाची होते.) पण ते एक जीभेवर जाड थर तयार करत असतात. तो साफ केल्यावरती जीभेचा मुळ रंग दिसेल. जेव्हा आपण आजारी असतोत तेव्हा डॉक्टर आपली जीभ पाहून आपल्याला कोणता आजार झाला आहे त्याचा अंदाज लावत असतात. रक्त आणि तोंडाच्या संसर्गाव्यतिरिक्त, आपल्या जीभेचा रंग ही सुचित करतो की तुम्हाला हृदयविकार आहे, की नाही.

वाचा: Health Tips | काय सांगता? खजुराच्या सेवनाने वजन होते कमी? जाणून घ्या योग्य वेळ अन् सेवनाची पद्धत

निरोगी जीभेचा रंग:
डॉक्टरांच्या मते, निरोगी शरीरासाठी ,जीभेचा रंग गुलाबी असावा आणि त्यावरती पातळ पांढरा थर असावा. काही व्यक्तींच्या शरीरानुसार जिभेचा रंग हलका गुलाबी आणि गडद गुलाबी असू शकतो. निरोगी जिभेच्या वर अनेक लहान, चमकणारे बम्प्स असतात जे जिभेचा वरचा भाग जाड करतात.

वाचा: High Cholesterol | पायांमध्ये ‘ही’ लक्षण जाणवत असतील तर दुर्लक्ष करू नका, आहेत उच्च कॉलेस्ट्रॉलची लक्षणे

कोणता रंग हृदयविकाराचा संकेत देतो
जर जीभेचा रंग निळा आणि जांभळा असेल तर तो रंग हृदयविकार दर्शवितो. हृदयाशी संबंधित समस्या , आजार, जेव्हा हृदय शरीरात योग्य रित्या पंप करत नाही तेव्हा जीभेचा रंग निळा किंवा जांभळा होऊ लागतो. कधी कधी रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे, जिभेचा रंग निळसर होतो अशी स्थिती गंभीर झाल्यास जिभेच्या रक्तवाहिन्यांना सूज येण्याचा धोका वाढतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Apart from the taste, the color of the tongue tells the symptoms of heart disease, know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button