ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Hand Transplant India | दिल्लीत डॉक्टरांनी केला चमत्कार! मृत महिलेचे हात बसवून अपंग रुग्णाला दिले नवे जीवन

Hand Transplant India | दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात डॉक्टरांनी एक अनोखा चमत्कार घडवून आणला आहे. तीन वर्षांपूर्वी रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या एका व्यक्तीचे दोन्ही हात पुन्हा जिवंत केले गेले आहेत.

या 45 वर्षीय व्यक्तीला 65 वर्षीय ब्रेन डेड महिलेचे हात बसवण्यात आले. तब्बल 12 तासांच्या अथक परिश्रमानंतर मृत महिलेचा हात कापून तरुणाला जोडण्यात 7 डॉक्टरांच्या पथकाला यश आले. (Hand Transplant India) ती व्यक्ती आता स्वतःच्या हाताने अन्न खाऊ शकते आणि सामान्य माणसाप्रमाणे इतर कामेही करू शकते.

या शस्त्रक्रियेचे नेतृत्व डॉ. महेश मंगल यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने केले. डॉ. मंगल हे देशातील प्रसिद्ध प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन असून, सध्या ते गंगाराम रुग्णालयाच्या प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरी विभागाचे अध्यक्ष कम एचओडी आहेत.

वाचा : Health Tips | हृदय निरोगी ठेवायचंय? योग, औषधी, आहार – आयुर्वेदाचा संपूर्ण मार्गदर्शक

या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाने त्या रुग्णाकडून कोणतेही शुल्क घेतलेले नाही. रुग्णालयाचे म्हणणे आहे की, अवयव दान ही एक महान सामाजिक सेवा आहे आणि त्याचे मोल पैशात मोजता येत नाही.

या शस्त्रक्रियेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एक ऐतिहासिक घडामोड घडली आहे. हा भारतातील उत्तर भारतातील अशा प्रकारचा पहिले यशस्वी दोन्ही हातांचे प्रत्यारोपण आहे. यापूर्वी मुंबईत या प्रकारचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे.

या शस्त्रक्रियेमुळे अवयव दानाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अवयव दान करून आपण अनेकांना नवजीवन देऊ शकतो.

Web Title | Hand Transplant India | The doctor did a miracle in Delhi! A disabled patient was given a new life by placing the hands of a dead woman

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button