ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Cotton Variety | शेतीलाच बनवले कृषी विद्यापीठ; कापसाच्या एवढ्या जाती काढल्या शोधून, वाचा नक्की कशा आहेत या जाती

Cotton Variety | बीड म्हंटले की, आपल्याला लगेच दुष्काळी (Drought Area) भाग आहे असं लक्षात येते. मात्र याच दुष्काळी बीड जिल्ह्यात एक असा, व्यक्ती आहे जो शेतीच्या पिकाच्या नवीन व्हारायटीवर अथक परिश्रम घेत आहे. कापसावर (Cotton) घेतलेल्या संसोधनात (Research) त्याच्या हाती एक अशी व्हारायटी लागली आहे. ती पाहून कोणीही थक्कच होईल. या व्यक्तीचे किसान देव नागरगोजे (Kisan Dev Nagargoje) आहे. यांचे वय ६५ वर्ष आहे. यांनी १० एकर शेती बीडच्या लगत भाडेतत्वावर (Rent) घेतली आहे.

१०० हून अधिक कापसाच्या जाती:

या जमीनीवर गेल्या ४० वर्षापासून किसान देव नागरगोजे संशोधन (Research) करत आहेत. शेतकरी असलेल्या या संशोधनाने आजपर्यंत त्यांनी अनेक नव नवीन पिकांच्या जाती आणि वान शोधून काढले आहे. अशातच मागील काही वर्षांपासून त्यांनी कापसावर संशोधन करायला सुरुवात केली आहे. त्यांनी १०० हून अधिक कापसांच्या जाती त्यांनी शोधून काढल्या आहेत. त्यातील एक जात अशी आहे जी ८ ते १० फुटापेक्षा जास्त वाढते. यातून शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळेल असे, नागरगोजे यांनी सांगितले आहे. हे कापसाचे झाड पाहिल्यानंतर आपल्याला त्याची परीचीती येईल. एक झाड पूर्ण डेरेदार बनले आहे. याला शेकडो बोंड पाहायला मिळतात.

वाचा: मोदी सरकारकडून सोने स्वस्त; स्वस्त सोने खरेदी करण्याची शेवटची संधी, जाणून घ्या काय असणार आहेत दर

या कापसाच्या (Cotton) झाडाची उंची आठ ते दहा फुट वाढत असल्याने यातून शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळत आहे. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत त्याचा नवीन प्रजाती उत्पन्न करण्यासाठी धडपड चालू आहे. विद्यापीठाने (University) या ठिकाणी येऊन आपण जो प्रयोग केला आहे त्याची तपासणी करावी. शेतकरी आणि समाज कल्याणासाठी नागरगोजे यांनी प्रयोगातून पुढे आणले. विविध जाती शेतकऱ्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी सरकार आणि कृषी विद्यापीठानी पुढाकार घेण्याची गरज आहे. नागरगोजे यांनी आपल्या शेतीलाच कृषी विद्यापीठ करून नवनवीन जाती शोधून काढल्या आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button