ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Market Rate | शेतकऱ्यांची चांदी तर नागरिकांची महागाईने होरपळ! बाजारात भाजांचे दर कडाडले, जाणून घ्या आजचे नवे दर

Market Rate | महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. किराणामाल, फळभाज्या, पालेभाज्यांच्या भावात 10 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे बाजारात टोमॅटो, घेवडा, हिरवी मिरची, वांगी, मटार, राजमा या फळभाज्यांनी तर शंभरी ओलांडली आहे. तसेच मागच्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे धान्य, फळभाज्या आणि पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. परिणामी पावसामुळे रोजच्या तुलनेत बाजारात (Market Rate) आवक घटली आहे. बाजारात मागणी अधिक आणि आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वाचा:  शेतकऱ्यांनो पावासाच्या अंदाजानुसार घ्या सोयाबिन अन् कपाशीची काळजी; त्वरीत जाणून घ्या हवामानावर आधारीत कृषि सल्ला

शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला चांगला दर

म्हणूनच बाजारातील भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे नागरिकांची कोंडी होत आहे. तर दुसरीकडे कधी नव्हे ते शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आहे. कित्येक शेतकरी तर टोमॅटोमुळे मालामाल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाला असाच जर दर मिळाला तर शेतकरी कर्जबाजारी होणार नाहीत आणि आत्महत्या देखील करणार नाहीत.

वाचा: तुम्हालाही कमी वेळात व्हायचंय करोडपती? तर ‘या’ पिकाची करा लागवड; पानांपासून मुळ्यांपर्यंत बाजारात विकलं जातंय चढ्या भावात

भाज्यांचे किरकोळ भाव

  • टोमॅटो- 160-200
  • वांगी – 80-100
  • घेवडा- 140-180
  • मटार – 250-260
  • हिरवी मिरची – 100-140
  • राजमा – 140-160

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The silver of the farmers and the inflation of the citizens! The prices of vegetables have increased in the market, know today’s new prices

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button